आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिनिशरचे काम कठीण; उत्तम फिनिशर महेंद्रसिंग धोनीने मांडले मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जगातील सर्वांत उत्तम फिनिशर मानले जाते. मात्र, फिनिशरचे हे काम सर्वात कठीण असल्याचे मत धोनीने व्यक्त केले. रांचीत न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनीने हे मत व्यक्त केले. धोनी गेल्या ११ वर्षांपासून टीम इंडियात फिनिशरची भूमिका समर्थपणे पार पाडत आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्ध रांची येथील आपल्या घरच्या मैदानावर धोनी अपयशी ठरला. याचा फटका भारताला पराभवाच्या रूपात बसला.

फलंदाजी क्रमात ५, ६ किंवा सातव्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करणे अत्यंत कठीण काम आहे. फिनिशर बनण्यासाठी क्रिकेटपटूला खेळपट्टी आणि त्या सामन्याच्या स्थितीशी लवकरात लवकर एकरूप व्हावे लागते. तो खेळाडू एक परिपूर्ण क्रिकेटपटू असेलच तर हे शक्य आहे. तळाला फलंदाजी करणे सोपे काम नाही. विशेषत: रांचीसारख्या संथ खेळपट्टीवर हे काम आणखी कठीण होते. एकेक धाव घेऊन स्ट्राइक बदलण्याचासुद्धा दबाव असतो. नेहमी ५, ६ किंवा सातव्या क्रमांकावर सातत्याने धावा काढणारा आणि विजय मिळवून देणारा फलंदाज शोधणे सोपे नाही, असे धोनीने सांगितले.

मागच्या दोन सामन्यांपासून धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत आहे.
फिनिशरच्या रूपात बघत आहेस, असे विचारले असता धोनीकडे थेट उत्तर नव्हते. तो म्हणाला, “भारताच्या निर्जीव आणि संथ खेळपट्ट्यांवर तळाला येऊन धावांचा पाठलाग करताना स्कोअर करणे हे सोपे काम नाही.

धोनी खतरनाक खेळाडू
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्लुमच्या मते धोनी चौथ्या क्रमांकावर खूप जास्त खतरनाक आहे. मॅक्लुम म्हणाला, ‘मोहालीत चौथ्या क्रमांकावर येऊन धोनीने डाव सावरला. धोनी शानदार खेळाडू आणि दमदार कर्णधार आहे. तो आपल्या प्रदर्शनाच्या बळावर संघाचे नेतृत्व करतो. तो भविष्यात धावांचे डोंगर उभे करेल. तो या क्रमांकावर खतरनाक ठरू शकतो,’ असेही त्याने नमूद केले.

पाचव्या वनडेवर ‘क्यांत’चे सावट
२९ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या भारत-न्यूझीलंड वनडेला फायनलचे रूप आले आहे. भारतीय चाहत्यांना निराश करणारी बातमी असून, विशाखापट्टणम सामन्यावर वादळी पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात ‘क्यांत’ नावाचे चक्रीवादळ पुढे सरकत आहे. याचा प्रभाव गुरुवारपासून दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...