आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Asked Gary Kirsten To Return As India Coach

गॅरी कर्स्टन पुन्हा टीम इंडियाचा प्रशिक्षक?, BCCI च्या संपर्कात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागील सहा महिन्यांपासून दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला लवकरच प्रशिक्षक मिळण्याचे चित्र आहे. या पदावर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर फलंदाज गॅरी कर्स्टन विराजमान होण्याची शक्यता आहे.

गत २०११ मध्ये टीम इंडियाला विश्वविजेता करण्यासाठी कर्स्टन यांची भूमिका प्रभावी ठरली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी विश्वचषकासाठी धडे गिरवावे लागणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकताच गॅरी कर्स्टन यांच्याशी संपर्क साधला. यासाठी बीसीसीआयने त्यांना दोन ते तीन वेळा दूरध्वनीवरून संपर्क केल्याचेही वृत्त आहे. प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेण्याबाबत निर्णय घेणे कठीण आहे. याबाबतचा योग्य प्रकारे निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गत २००८ मध्ये कर्स्टन यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर विश्वचषक जिंकल्यानंतर २०११ मध्ये आपले पद सोडले. त्यांनंतर डंकन फ्लेचर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, गोलंदाजी कोचसाठी जहीर खान उत्सुक