आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना जाणवतोय थकवा; झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना थकवा जाणवत आहे. त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे झिम्बाब्वे दौरा रद्द करण्‍यात आल्याचे बीसीसीआय सूत्रांनी सांगितले. परंतु, बीसीसीआय आणि चॅनल टेन स्पोर्टसमध्ये प्रक्षेपणावरून (ब्रॉड कास्टिंग) सुरू असलेला वाद, हेच झिम्बाब्वे दौरा रद्द होण्यामागील कारण असल्याची माहिती मिळाली आहे.

टीम इंडिया येत्या 7 जुलैपासून झिम्बाम्बे दौरा करणार होता. भारत आणि झिम्बाब्वेमध्ये या दौऱ्यात तीन वन डे आणि दोन ट्‍वेण्टी-20 सामन्यांचा सामवेश होता.
टेन स्पोर्ट्ससोबत वाद
बीसीसीआय आणि टेन स्पोर्ट्‍समध्ये मालिकेच्या प्रक्षेपणावरून मागील अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेटनेही (झेडसी) प्रयत्न केले. परंतु, त्यावर ठोस तोडगा न निघाल्याने अखेर हा दौरा रद्द केल्याचे बीसीसीआय जाहीर केले.

बीसीसीआय आणि टेन स्फोर्ट्‍समध्ये सुरु असलेला वाद न सुटल्यामुळे झिबॉब्वे आणि भारताच्या झिम्बाब्वे दौर्‍यावर पाणी ‍फिरल्याचे झिम्बाब्वे क्रिकेटचे (झेडसी) अध्यक्ष विल्सन मनासे यांनी म्हटले आहे.