आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय युवा टीमने चाैरंगी मालिका जिंकली; अाॅस्ट्रेलियावर 57 धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅकी- कर्णधार मनीष पांडेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी चाैरंगी वनडे मालिका जिंकली. भारताच्या युवा टीमने फायनलमध्ये अाॅस्ट्रेलिया संघावर मात केली. भारतीय संघाने ५७ धावांनी सामना जिंकला.

यजुवेंद्र चहल (४/३४), धवल कुलकर्णी (२/२२), नायर (२/२९) अाणि अक्षर पटेल (२/३३) यांनी धारदार गाेलंदाजी करताना भारताला विजय मिळवून दिला. याशिवाय सलामीवीर मनदीप सिंग (९५)व कर्णधार पांडेने (६१) विजयात अर्धशतकाचे याेगदान दिले. मनदीप हा सामनावीरचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना भारताने बाद २६६ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाने ४४.५ षटकांत अवघ्या २०९ धावांत गाशा गुंडाळला.

चहलचा चाैकार : भारताकडून यजुवेंद्र चहलने बळींचा चाैकार मारला. त्याने ८.५ षटकांत ३४ धावा देत चार विकेट घेतल्या. त्याने स्टाेइनिस (१२), रिचर्डसन (२), ट्रेमिन (२) अाणि बाॅयसीला (६) झटपट बाद केले.

संक्षिप्त धावफलक : भारतसंघ : बाद २६६ धावा, अाॅस्ट्रेलिया संघ : २०९ (४४.५ षटक).
मनदीप, पांडेचा झंझावात

मनदीपसिंग कर्णधार पांडेने झंझावाती फलंदाजी केली. यात मनदीपने ९५ धावांची खेळी केली. त्याचे धावांनी शतक हुकले. त्याने १०८ चेंडूंत ११ चाैकारांच्या अाधारे ही धावसंख्या उभी केली. पांडेने ७१ चेंडूंत ६१ धावा काढल्या. श्रेयस अय्यरने ४१, पटेलने नाबाद २२ धावांचे याेगदान दिले.
बातम्या आणखी आहेत...