आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डकप २०१६ पर्यंत कोचची नियुक्ती नाही, शास्त्रींकडेच जबाबदारी राहण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) २०१६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपपर्यंत टीम इंडियासाठी नियमित पूर्णकालीन कोचची नियुक्त होण्याची शक्यता कमीच आहे.

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने कोचची नियुक्ती पुढच्या वर्षापर्यंत टाळली आहे. बांगलादेश दौऱ्यानंतर नियमित कोचच्या नियुक्तीची चर्चा होती. बांगलादेश दौऱ्यात टीम डायरेक्टर रवी शास्त्रीच अंतिरम कोचच्या भूमिकेत होते. रवी शास्त्री व संघाचे इतर तिघे बॉलिंग कोच भारत अरुण, फील्डिंग कोच आर. श्रीधर आणि फलंदाजी कोच संजय बांगर हे टीम इंडियासोबत कायम राहण्याची शक्यता आहे. या चौघांचे पुढच्या वर्षापर्यंत करार वाढवण्याची तयारी बीसीसीआयने केली असल्याचे वृत्त आहे.

कसोटी कर्णधार विराट कोहली आणि वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या संमतीनंतरच बीसीसीआयने या चौघांना टी-२० वर्ल्डकपपर्यंत करार वाढवणार असल्याचे सूचित केले आहे. ६ जुलैपासून टीम इंडियाचा प्रस्तावित झिम्बाब्वे दौरा आहे. यापूर्वी या चौघांना हा करार मिळण्याची शक्यता आहे. या चौघांसोबत टीम इंडियाच्या खेळाडूंची व्यवस्था योग्यच असल्याचे बीसीसीआयला वाटते.
बातम्या आणखी आहेत...