आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मशालेत येत्या 21 जूनला क्रिकेट परिषद; IPLच्या लोकप्रियतेसाठी BCCI ची चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) पहिली वार्षिक क्रिकेट परिषद २१ ते २४ जूनदरम्यान धर्मशाला येथे आयोजित करण्यात आली आहे. बीसीसीआयने गुरुवारी जाहिरातीद्वारे ही माहिती दिली. परिषदेची सुरुवात सर्व राज्य क्रिकेट संघटनांच्या माध्यम प्रतिनिधींच्या कार्यशाळेने होईल. यात डिजिटल माध्यमांवरदेखील सत्र ठेवण्यात आले आहे. त्यानंतर प्रशिक्षक, कर्णधार, आयपीएल संचालन परिषद, ज्युनियर समिती, मान्यता समित्यांची बैठक घेण्यात येईल.

क्रिकेट परिषद शुक्रवारी २४ जून रोजी बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर समाप्त होईल. आशा आहे की, याच कार्यकारी समितीच्या बैठकीत भारतीय संघाच्या पुढील प्रशिक्षकाच्या विषयावर निर्णय घेतला जाऊ शकतो. परिषदेत देशांतर्गत क्रिकेट सत्राला मजबूत करणे आणि जगात वेगाने प्रसार होत असलेल्या क्रिकेट लीग आयपीएलला आनखी लोकप्रिय बनवण्यावर चर्चा केली जाईल. मंडळाच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीला पारदर्शक बनवण्यावरदेखील विचार होईल. परिषदेचे आयाेजन करण्याची ही पहिलीच वेळ अाहे. क्रिकेटशी संबंधित सर्व व्यक्तींना एकाच व्यासपीठावर आणणे आणि खेळात सुधारणा करण्यासाठी विचारविनिमय करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी म्हटले. परिषदेचे आयोजन करण्यासाठी यापेक्षा चांगला कालावधी असू शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...