आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया प्रशिक्षक: 57 पैकी 21 जणांची प्राथमिक निवड; 22 जूनपर्यंत निर्णय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कधी नव्हे एवढा उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर ५७ अर्जदारांपैकी २१ जणांच्या नावाला प्राथमिक मंजुरी दिल्याची माहिती बीसीसीआय सचिव अजय शिर्के यांनी आज दिली. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समितीप्रमुख समन्वयक, संजय जगदाळे यांच्या साहाय्याने २१ जणांमधून भारताच्या भावी क्रिकेट प्रशिक्षकाची निवड करणार आहे.

अजय शिर्के म्हणाले, ‘संजय जगदाळे हे अनुभवी क्रिकेटपटू आणि प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव भारताच्या क्रिकेट प्रशिक्षकाची निवड करताना कामी येईल. सचिन तेंडुलकर या सल्लागार समितीचा प्रमुख सदस्य आहे. मात्र सध्या तो परदेशात असल्याने समिती त्याचे मत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा जाणून घेईल. सचिननेही त्या सर्व वेळी आपण उपलब्ध असू, असे कळविले असल्याचे शिर्के म्हणाले.’

संजय जगदाळे सर्व अर्जांची छाननी करून प्रत्येक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करतील. या २१ जणांव्यतिरिक्त समितीला आवश्यकता वाटली तर सर्वच्या सर्व म्हणजे ५७ उमेदवारांचे अर्जही उपलब्ध करून देण्यात येतील, असे शिर्के म्हणाले.

२२ जूनपर्यंत निर्णय?
उमेदवारांशी चर्चा झाल्यानंतर समिती आपला अंतिम निर्णय २२ जूनपर्यंत बीसीसीआय सचिवांना कळवतील, सचिव तो अध्यक्षांना सादर करतील २४ जून रोजी होणाऱ्या कार्यकारिणीपुढे तो निर्णय मंजुरीसाठी ठेवण्यात येईल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...