आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौरव गांगुलीसह मंडळाची चारसदस्यीय समिती गठित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यायमूर्ती लोढा समितीच्या आदेशाचे अध्ययन करणे आणि सहा आठवड्यांत शिफारशी देण्यासाठी बीसीसीआयने चारसदस्यीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आणि बीसीसीअायचे कोशाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे. राजीव शुक्ला या समितीचे अध्यक्ष असतील. बीसीसीआयचे कायदेशीर सल्लागार यू.एन. बॅनर्जी या समितीला मदत करतील.

आयपीएल-९ साठी योजनेचे काम : या चारसदस्यीय समितीला लोढा समितीच्या निर्णयाचे अध्ययन करणे तसेच आयपीएल-९ साठी रोडमॅप, योजना तयार करण्याचे काम करावे लागेल. संचालन परिषदेचे सदस्य अजय शिर्के आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनासुद्धा या समितीमध्ये सामील केले जाईल, असे मानले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...