आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोढा समितीबाबत आज बीसीसीआयची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू करा, अन्यथा आम्ही त्या अमलात आणू, या सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर खडबडून जाग आलेल्या बीसीसीआयने लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी उद्या तातडीची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. लोढा समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून सर्व संघटनांनी आपापली मते मांडावीत, असे आवाहन बीसीसीआयने केली आहे. ७० वयोमर्यादा, नेते, मंत्र्यांना बीसीसीआयवर येण्यास आडकाठी, एक राज्य एक मत, दोन षटकांदरम्यान जाहिराती दाखवण्यास निर्बंध, अशा शिफारशींना बीसीसीआयच्या सदस्यांकडून विरोध अपेक्षित केला जात आहे. प्रत्येक शिफारसीचा प्रत्येक राज्य संघटनेवर कोणता परिणाम होणार आहे, हे उद्याच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

बीसीसीआयच्या तातडीच्या सर्वसाधारण सभेआधी मुंबईत सकाळी बीसीसीआयच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यामध्ये सर्व उपसमित्यांनी घेतलेल्या निर्णयांना मान्यता देण्याबाबत चर्चा होईल.

तातडीच्या सभेत आयसीसीने आगामी कालावधीसाठी करण्यात आलेल्या घटनात्मक बदलाविषयी माहिती सदस्यांना देण्यात येईल. त्या बदलामुळे भारताचा आयसीसीमधील आर्थिक वाटा घटणार आहे. तसेच भारतासह ऑस्ट्रेलिया व इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डांच्या मक्तेदारीलाही पूर्णविराम मिळणार आहे. आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी बीसीसीआयला ३ मार्चपर्यंत अवधी दिला आहे. मात्र, तातडीने निर्णय घेण्यासाठी व भूमिका निश्चित करण्यासाठी बीसीसीआयने तातडीची सभा मुंबईत आयोजित केली आहे.