आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोढा समितीमुळे BCCI भिकेला; BCCI चे अध्यक्ष ठाकूर यांचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आयसीसी- बीसीसीआयमध्ये पैसा प्रतिष्ठेवरून तणाव वाढला आहे. बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी त्यावर पहिल्यांदाच मते मांडली. बीसीसीआयचे अधिकार मर्यादित होण्यास लोढा समिती कारणीभूत आहे. त्यामुळेच आयसीसी डोळे वटारत आहे. कालपर्यंत आमचे ऐकून धोरणे ठरवणारे जगभरातील लोक आज आम्हाला कंगाल म्हणत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. ठाकूर यांनी मांडलेले मुद्दे...

लोढा समितीच्या अहवालावर बीसीसीआय एवढी का नाराज आहे ?
- त्यांच्या शिफारशींवर आमचा आक्षेप आहे. एक राज्य एक बोर्डचेच घ्या. वर्षे कार्यकाळानंतर वर्षांचा ब्रेक, असे समिती म्हणते. एखाद्या संघटनेत असे होऊ शकते, असे प्रथमच ऐकले आहे. यामुळे नेतृत्व क्षमताच संपेल. मोठे नुकसान होईल.

नुकसानकाय हाेईल ?
क्रिकेट विश्वात जगभरात भारताचा दबदबा असून या शिफारशींमुळे हा दबदबा संपुष्टात येण्याची भीती आहे. तीन वर्षांसाठी एखादा व्यक्ती आयएएस अधिकारी बनेल आणि नंतरचे तीन वर्ष आराम करेल, असे कुठे होते का ? कुणी खासदार बनल्यानंतर तीन वर्षांनी अज्ञातवासात जाऊ शकतो का? अनेक वर्षांच्या अनुभवानंतर नेतृत्व तयार होत असते आणि जग त्याला मान्यता देते.

लोढासमितीचा अहवाल राज्यातील संघावर लागू होईल ?
नाही,तो राज्यांसाठी नाही. सुरुवातीला तो बीसीसीआयसाठी आहे. बोर्डाने त्याला आव्हान दिले आहे.

१५नोव्हेंबरपर्यंत निवडणूक घेण्यास सांगितले आहे ?
यासर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची बैठक २१ सप्टेंबरला मुंबईत होईल. बोर्ड त्याचवेळी निर्णय घेईल. आम्ही लोढा समितीच्या शिफारशींना आव्हान दिले असून रिव्ह्यू पिटीशन दाखल केले आहे. न्यायमूर्ती काटजू यांनीही विस्तृत प्रतिसाद दिला आहे.

राजस्थानअसोसिएशन निलंबित आहे, तेथे निवडणूक होईल का ?
नाही,बोर्डाच्या जुन्या नियमानुसार जर ललित मोदी अध्यक्ष आहेत तर आरसीए निलंबितच राहिल.

ललित यांचे चिरंजीव आरसीएची निवडणूक लढवणार असतील तर बार्ड काय करेल ?
याबद्दलकाही माहिती नाही. जेव्हा ती वेळ येईल, तेव्हा बोर्ड निर्णय घेईल.

राजस्थानमध्येआयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामने बंद आहेत...
राजस्थानचेनुकसान व्हावे, असे बोर्डाला वाटत नाही. परंतु यावर आरसीएला निर्णय घ्यायचा आहे. ज्या बोर्डाशी संलग्निकरण आहे अशा बोर्डाच्या विरोधात पाऊल उचलले तर त्या भागाला नुकसान होणारच. त्यांनी चूक सुधारावी.

पुढील स्लाइडवर वाचा, पैशांंबाबत बीसीसीआय खोटे बोलत आहे : मनोहर
बातम्या आणखी आहेत...