आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BCCI Will Now Give Performance Based Bonus To Players

कामगिरीच्या आधारावर आता बोनस मिळणार : बीसीसीआय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशांतर्गत आणि विदेशी भूमीवर खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर त्यांना बोनस देण्याची योजना बीसीसीआय तयार करीत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळात अशी योजना आधीपासूनच कार्यरत आहे.

बीसीसीआयच्या आर्थिक समितीच्या बैठकीत या योजनेचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला. बीसीसीआयची आर्थिक समिती कॉर्पोरेट समूहाप्रमाणे कामगिरीच्या आधारावर बोनस देण्याच्या योजनेवर काम करण्यास तयार झाली आहे. यासाठी काय करावे लागेल, याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलचे सीओओ सुंदर रमण यांनी आर्थिक समितीसमोर या योजनेबाबत माहिती दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ईसीबी तसेच पीसीबीनेसुद्धा अशा योजनेवर काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.