मुंबई- येत्या रविवारी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआय कार्यकारिणी बैठकीत जगमोहन दालमिया यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या कार्यकारी समितीच्या तहकूब करण्यात आलेल्या बैठकीतील कार्यक्रमपत्रिका तीच कायम आहे.
दालमिया यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मुंबईत ही बैठक होईल. कोणत्याही सदस्यांवर सूडबुद्धीने कारवाई करणार नाही, हे शशांक मनोहर यांनी स्पष्ट केलेले आहे.
त्यावर निर्णय होणारलोढा समितीचा अहवाल पूर्णपणे स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे अहवालातील सूचना डावलून दोषी फ्रँचायझींना शिक्षा करण्याची गरज नाही, असे बीसीसीआयचे मत आहे. सुपरकिंग्ज व राजस्थानला समितीने सुचवलेलीच शिक्षा कायम करण्याचे सदस्यांचे मत आहे.