आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस अधिकाऱ्याचा हा मुलगा, असा बनला स्टार क्रिकेटर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार सध्या आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. त्याने बुधवारीच आपल्या भावी पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला. त्यावर नुपूर नागर हिला 'बेटर हाफ' असे म्हटले. भुवनेश्वरच्या पर्सनल लाइफबद्दल बोलावयाचे झाल्यास तो अगदी छोट्याशा शहरातून आलेला आणि एका पोलिस उप-निरीक्षकाचा (PSI) मुलगा आहे. मेरठ येथे राहून भुवीने मोठ्या संघर्षानंतर टीम इंडियामध्ये जागा निश्चित केली.
 

छोट्या शहरात गेले लहानपण...
- भुवनेश्वर कुमारचा जन्म उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे 5 फेब्रुवारी 1990 रोजी झाला. त्याचे वडील किरणपाल सिंह यूपीत सब इंस्पेक्टर होते. तर आई बुलंदशहर येथील रहिवासी होत्या.
- भुवीला क्रिकेटर बनवण्यात सर्वात मोठे सहकार्य मोठी बहिण रेखाने केले. 13 वर्षांचा असताना त्याला बहिणीनेच क्रिकेट कोचिंग सेंटरला नेले होते. 
- वडिलांना वेळ नव्हता आणि आईला काही कळत नव्हते. अशात रेखानेच पहिल्यांदा आपल्या घरापासून 7-8 किमी दूर असलेले स्टेडिअम भुवीला दाखवले होते. 
- क्रिकेटचे प्रत्येत साहित्य विकत घेण्यासाठी तो आपल्या 7 वर्षे मोठ्या असलेल्या बहिणीलाच घेऊन जायचा. एवढेच नव्हे, तर रेखाने शिक्षकांनाही सांगितले होते, की याला अभ्यासाचे जास्त ताण देऊ नका.
- वडिलांचे बदली झाल्याच्या परिस्थितही भुवीच्या शिक्षण आणि क्रिकेटची काळजी बहिणच घेत होती. 
 

सचिनला शून्यावर बाद करण्याचा विक्रम
- भुवनेश्वर कुमार यूपीतून डॉमेस्टिक क्रिकेट देखील खेळतो. दलीप ट्रॉफीत तो सेंट्रल जोनकडून खेळतो. 
- भुवीने आपले फर्स्ट क्लास डेब्यू 17 वर्षांचा असताना पश्चिम बंगालकडून केले होते. 
- 2008-09 च्या रणजी फायनलमध्ये भुवीने सचिनला शून्यावर बाद केले होते. असे करणारा तो पहिला बॉलर ठरला होता.
- भुवनेश्वरने आपला पहिला इंटरनॅशनल डेब्यू 25 डिसेंबर 2012 रोजी पाकिस्तान विरुद्धच्या टी-20 मध्ये केला होता. यात त्याने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली.
- टेस्ट त्याचा टेस्ट डेब्यू फेब्रुवारी 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झाला. तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिली विकेट क्लीनबोल्ड घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, भुवनेश्वरच्या पर्सनल लाइफचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...