आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात सचिनला टाकला एकच चेंडू त्यावरच केले होते बाद, वाचा कोण आहे तो...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल) - Divya Marathi
(फाइल)
स्पोर्ट्स डेस्क - मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर क्रीझवर असताना त्याची विकेट घेणे हे समोरच्या प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न होते. सर डॉन ब्रॅडमॅन नंतर क्रिकेट जगतातील सर्वात महान फलंदाज म्हणून सचिनला ओळखल्या जाते. असाही एक गोलंदाज होता, ज्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला केवळ एकच बॉल टाकला आणि त्याच बॉलवर चक्क आऊट देखील केले. त्या बोलरचे नाव स्टीव्ह स्मित आहे. स्टीव्ह स्मित सध्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आहे. तसेच कधी-कधीच तो गोलंदाजी करतो. आज स्मिथ एक नावाजलेला फलंदाज म्हणून ओळखल्या जातो. 
 
 
- मोजक्या लोकांनाच माहिती असेल की स्टीव्ह स्मिथने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात एक फिरकी गोलंदाज म्हणून केली होती. तो नेहमीच ऑल राउंडर म्हणून खेळत आला आहे. 
- मोहालीच्या मैदानावर 2013 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा टेस्ट सामना रंगला होता. भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजचा तो तिसरा सामना होता. 
- स्टीव्ही स्मिथने या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर सचिनला शॉर्ट लेगवर एड कोवेनच्या हातून झेलबाद केले होते. क्रिकेटचा देव सचिन 37 धावांवर झेलबाद झाला होता.
- यानंतर स्मिथला कधीही टेस्ट मॅचमध्ये गोलंदाजीची संधी मिळाली नाही. तरीही सचिनला बाद करण्याचा क्षण त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरला.
 
 
अशी होती मॅच
14 ते 18 मार्च 2013 दरम्यान चाललेल्या या सिरीजच्या तिसऱ्या मॅचमध्ये ऑस्‍ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 408 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करत मुरली विजयच्या 153 आणि शिखर धवनच्या 187 धावांमुळे भारताने 499 धावांचा स्कोर केला होता. पहिल्या दिवशीच्या फलंदाजीत सचिन तेंडुलकर 37 धावांवर असताना स्मिथच्या बॉलवर झेलबाद झाला होता. यावेळी सचिनने 125 चेंडू खेळत 5 चौकार लावले होते. ऑस्‍ट्रेलियाने दुसऱ्या वेळच्या बॅटिंगमध्ये सर्वबाद 223 धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर देत भारताने 4 विकेट गमवून 136 धावा करत विजय प्रस्थापित केला होता. 
बातम्या आणखी आहेत...