आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेट लीचा ‘अनइंडियन’ चित्रपट १५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ऑॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली अभिनित ‘अनइंडियन’ चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्रॉस कल्चर कॉमेडीचा तडका चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तनिषा चटर्जीची त्यात भूमिका पाहायला मिळेल. ऑस्ट्रेलिया इंडिया फिल्म फंड (एआयएफएफ) संस्थेची ही पहिलीच निर्मिती आहे. रोमँटिक कॉमेडी प्रकारातील या चित्रपटात ब्रेट ली सिडनीतील एका महिलेच्या प्रेमात पडतो. मीरा नावाची ही व्यक्तिरेखा भारतीय आहे. अरका डॅस, सारा रॉबर्ट, अॅडम डून, निकोलास ब्राऊन, कुमू मेराणीशिवाय बॉलीवूड स्टार सुप्रिया पाठक-कपूर, आकाश खुराणा, पल्लवी शारदा यांच्याही भूमिका आहेत.