Home »Sports »Cricket »Cricket Celebrities» Bumrah Was Born In December 1993 In Ahmedabad, Gujarat In Sikh Ramgarhia Family

टीम इंडियाचा स्टार बॉलर, आईमुळे नकळतच बनला यॉर्कर स्पेशलिस्ट

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 11:48 AM IST

स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर आणि जगातील बेस्ट डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराहने 6 डिसेंबर रोजी आपला 24 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचे त्याने डबल सेलिब्रेशन केले. याच दिवशी त्याला आपली निवड दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषित झालेल्या इंडियन टीममध्ये झाल्याची माहिती मिळाली. बुमराहचा जन्म 1993 मध्ये गुजरातच्या एका पंजाबी कुटुंबात झाला.

लहान असताना वडिलांचा मृत्यू
- जसप्रीत बुमराह 7 वर्षांचा होता, तेव्हाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आई दलजीत कौरने त्याची काळजी घेतली. त्याचे वडील जसबीर सिंह रासायनिक कारखान्यात काम करत होते. तर आई शाळेत प्रिन्सिपल आहे.
- भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर होण्याचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. वडिलांच्या मृत्यूनंतर आईनेच बुमराह आणि त्याचे मोठी बहिण जहिका यांचे संगोपन केले.

आईमुळेच असा बनला यॉर्कर स्पेशलिस्ट
- बुमराहच्या आई दलजीत कौर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की बुमराह लहानपणापासूनच क्रिकेटवेडा आहे. "भर दुपारी सुद्धा तो बॉलिंग प्रॅक्टिस करायचा. त्याच्या आवाजांनी त्रस्त होऊन मी त्याला सांगितले होते, की चेंडू असा फेक की भिंतीला लागून आवाज होणार नाही."
- "यानंतर त्याने बॉल भिंत आणि जमीनीच्या कोपऱ्याला लागेल असे बॉल फेकण्यास सुरुवात केली. मला कल्पनाही नव्हती की असे करून तो यॉर्कर स्पेशलिस्ट होईल."
- 14 वर्षांचा असताना बुमराहने आईला सांगितले होते, आपण क्रिकेटर होणार. लहान असताना क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकालाच आपण क्रिकेटर होऊन असे वाटते. पण, तसे प्रत्यक्षात उतरवणे काही सोपे नाही. तरीही बुमराहने आपण केलेला दावा आणि स्वप्न दोन्ही साकारले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बुमराहच्या फॅमिलीचे आणखी काही फोटोज...

Next Article

Recommended