आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर प्रज्ञान ओझा 'बेपत्ता' CAB ने त्याला सोडून केली टीमची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
CAB चा ओझाशी संपर्क होऊ शकला नाही. - Divya Marathi
CAB चा ओझाशी संपर्क होऊ शकला नाही.
कोलकाता - CAB (क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगॉल) च्या नजरेत त्यांच्या संघाचा क्रिकेटर प्रज्ञान ओझा बेपत्ता झाला आहे. कित्येक प्रयत्न केल्यानंतरही ओझाशी संपर्क होऊ शकलेला नाही. यानंतर त्याचा विचारही न करता टीमची घोषणा करण्यात आली आहे. बोर्डाच्या संयुक्त सचिवांनी सांगितल्याप्रमाणे, ओझाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 

नाराजीमुळे झाला गायब...
- CAB चे संयुक्त सचिव अविषेक डालमिया यांनी सांगितल्याप्रमाणे, "आम्ही ओझाशी संपर्क साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळेच, आम्हाला ओझास टीममधून बाहेर करावे लागले आहे."
- गुजरात दौऱ्यात पश्चिम बंगालचा संघ 2 वॉर्म-अप मॅच खेळणार आहे. यात पहिला सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. याच दरम्यान, सुरतमध्ये सुद्धा मॅच खेळले जाणार आहेत. 
- नाराज असल्यामुळेच तो गायब झाल्याचे बोर्डाने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ओझाने हैदराबाद संघात खेळण्यासाठी बंगाल बोर्डाकडून NOC मागितला होता. मात्र, बोर्डाने तसे देण्यास नकार दिला. 
- प्रज्ञान ओझा गेल्या दोन सीजनपासून बंगालच्या टीममध्ये खेळत आहे. यापूर्वी तो हैदराबादसाठी खेळत होता. 
- एनओसी देण्यासाठी माजी सौरभ गांगुलीने त्याला नकार दिल्याचे सांगितले जात आहे. हैदराबाद टीमचा फॉर्म खराब असताना बंगाल टीमने त्याला संघात घेतले होते असे गांगुलीने स्पष्ट केले होते.
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रज्ञान ओझाच्या खासगी आयुष्यातील फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...