आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'IPL\'मधून चेन्नई-राजस्थान दोन वर्षासाठी बाहेर, मयप्पन-कुद्रांवर आजीवन बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुनाथ मयप्पन (डावीकडे आणि राज कुंद्रा (फाईल फोटो) - Divya Marathi
गुरुनाथ मयप्पन (डावीकडे आणि राज कुंद्रा (फाईल फोटो)
नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेतृत्व करीत असलेल्या आयपीएलमधील चेन्नई संघाचे दोन वर्षासाठी निलंबन केले आहे. राजस्थान रॉयल्स या संघालाही पुढील 2 वर्षासाठी निलंबित केले आले आहे. चेन्नई टीमचा टीमचा प्रिंसिपल व श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन व राजस्थान टीमचा सहमालक राज कुंद्रा या दोघांनाही क्रिकेटशी कोणत्या प्रकारचा संबंध ठेवण्यास अजीवन बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधिश आर. एम. लोढा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मयप्पन हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व इंडिया सिमेंट कंपनीचे मालक एन. श्रीनिवासन यांचा जावई आहे तर राज कुंद्रा हा राजस्थान संघाचा सहमालक व अभिनेत्री शिल्पा शेटीचा पती आहे.
जस्टिस लोढांनी काय म्हटले?
जस्टिस लोढा यांनी सांगितले की, मयप्पन आणि राज कुंद्रा यांचा सट्टेबाजीत थेट सहभाग होता. मयप्पन यांना तर यात 60 लाखांचे नुकसान झाले होते. मयप्पन यांनी बीसीसीआय व आयपीएलची प्रतिमा खराब केली आहे. मयप्पन व कुंद्रा यांना भविष्यात क्रिकेट खेळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवता येणार नाही. मयप्पन-कुंद्रा सट्टेबाजीत दोषी आढळल्याने त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात येत आहे. राजस्थान रॉयल्स संघामुळे खेळ भावनेला नुकसान पोहचले आहे. राज कुंद्रा यांनीही काही गडबडी केल्या आहेत.
दोषी ठरले होते राज कुंद्रा आणि मयप्पन
राजस्थान रॉयल्स टीमचा सहमालक राज कुंद्रा आणि चेन्नई टीमचा प्रिंसिपल व श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन यांना 2013 आयपीएल सामन्यात सट्टेबाजी व फिक्सिंगप्रकरणी जानेवारी 2015 मध्ये दोषी ठरवले होते. 2013 मध्ये झालेल्या `आयपीएल’च्या सातव्या पर्वातील `स्पॉट फिक्सिंग’ आणि सट्टेबाजीत गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांचा बेटिंगमध्ये थेट समावेश होता, असा ठपका कोर्टाने ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने 130 पानांच्या या निकालपत्रात मयप्पन आणि राज कुंद्रा हे दोघेही सट्टेबाजी प्रकरणी दोषी असल्याचे स्पष्ट म्हटले होते. कोर्टाने या प्रकरणी अधिक चौकशीसाठी माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले होते. सट्टेबाजीत दोषी ठरलेल्या मयप्पन आणि राज कुंद्रा यांना शिक्षा ठोठावण्याचा अधिकारही या समितीला दिला होता. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाचे भवितव्य ठरविण्यासाठी न्यायालयाने माजी मुख्य न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. अशोक भान आणि आर. व्ही. रविंद्रन यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. अखेर आज लोढा यांनी याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण... आत्तापर्यंत काय काय घडले...

16 मे 2013 - तीन प्लेअर्स फिक्सिंगप्रकरणी अटकेत

21 मे 2013 - विंदू दारा सिंग सट्टेबाजीप्रकरणी अटकेत

21 मे 2013- मयप्पन पोलिसांच्या ताब्यात

2 जून 2013 - बीसीसीआयने याप्रकरणी चौकशी समिती नेमली

28 जुलै 2013 - बीसीसीआय समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स टीमला क्लिन चिट

30 जुलै 2013 - आदित्य वर्मा यांची कोर्टात याचिका

5 ऑगस्ट 2013 - बीसीसीआयचं सुप्रीम कोर्टात अपील

12 सप्टेंबर 2013 - श्रीशांत, अंकितवर आजीवन बंदी

7 ऑक्टोबर 2013 - सुप्रीम कोर्टाने मुदगल कमिटी नेमली

3 नोव्हेंबर 2014 - मुदगल कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्टात

22 जानेवारी 2015- मयय्पन व राज कुंद्रा सट्टेबाजीत दोषी आढळले

14 जुलै 2015- मयप्पन व कुंद्रा यांच्या आजीवन बंदी तर चेन्नई व राजस्थान संघ दोन वर्षासाठी निलंबित.

पुढे वाचा, धोनीसह चेन्नई व राजस्थान टीममधील खेळाडूंचे भवितव्य काय...
श्रीनिवासन यांच्या कपंनीचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले....
बातम्या आणखी आहेत...