आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्रिस गेलच्या हातात बेड्या असलेला फोटो व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्जटन - चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेला वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ख्रिस गेलचे बेड्या घातलेले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यात तो एका बारमध्ये उभा असलेला दिसतो. हे छायाचित्र दुस-या- तिस-या कुणी नव्हे तर स्वत: गेलनेच आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहे.
‘तुम्ही पार्टीत गैरवर्तन केले आणि तुम्हाला पार्टीतून हाकलून लावले तर तुम्ही काय कराल? हो! माझ्याबाबतीतही तसेच घडले आणि तेव्हा मी पोलिस अधिका-याला विचारले. मी बॅड बॉय आहे, तुम्ही माझ्यासोबत डान्स कराल काय?’ अशा फोटोओळीही स्वत:ला ‘बॅड बॉय समजणा-या गेलने लिहिल्या आहेत. गेलने आपल्या जगभरातील चाहत्यांसाठी हे छायाचित्र शेअर केले आहे.