आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीत त्रिशतक झळकावण्याची गेलची राेहितकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्टइंडीजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलने टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माकडे आपली एक इच्छा व्यक्त केली आहे. युवराजसिंगच्या ‘क्लोदिंग लाइन यू, वुई कॅन’च्या विमोचनप्रसंगी क्रिस गेलने रोहितला िट्वट करून मागणी केली. गेल म्हणाला, ‘आपण दोघे वनडेत द्विशतक ठोकणाऱ्यांच्या क्लबमध्ये सामील आहोत. आता रोहित शर्माला कसोटीत त्रिशतक ठोकताना मला बघायचे आहे.’

मात्र, याआधी वीरेंद्र सेहवागने िट्वटवर वेस्ट इंडीजचा क्रिस गेल, टीम इंडियाच्या रोहित शर्मासोबत आपला एक फोटो शेअर केला. या फोटोसह सेहवाग म्हणाला, ‘या एका फोटोत कसोटीतील चार त्रिशतके आणि वनडेतील द्विशतके आहेत...युनिव्हर्स बॉस आणि मिस्टर टॅलेंटसोबत मी...’. या छायाचित्रातील सेहवागने कसोटीत त्रिशतके ठोकली आहेत. सेहवागने पहिले त्रिशतक मुलतान येथे पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावा काढत ठोकले होते. यानंतर त्याने दुसरे त्रिशतक द.आफ्रिकेविरुद्ध चेन्नईत ३१९ धावा काढून झळकवले होते. क्रिस गेल सर्व स्वरूपात खतरनाक फलंदाजीसाठी सुप्रसिद्ध आहे. त्याने कसोटीत त्रिशतके ठोकली आहेत. गेलने द. आफ्रिकेविरुद्ध सेंट जोन्स येथे ३१७ धावा काढल्या होत्या. याशिवाय त्याने श्रीलंकेविरुद्ध गॅले येथे ३३३ धावांची खेळी केली होती. मात्र, रोहित शर्मा अद्याप कसोटीत एकही त्रिशतक ठोकू शकलेला नाही. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये द्विशतके ठोकली आहेत. रोहितने वनडेत २०९ आणि २६४ धावांची खेळी केली आहे. २६४ धावांची खेळी वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर क्रिस गेलने वनडेत २१५ आणि वीरेंद्र सेहवागने वनडेत २१९ धावा काढल्या आहेत.
सेहवागने क्रिस गेल आणि रोहित शर्मासोबत हा फोटो टि्वटरवर शेअर केला.
ब्रॅडमनच्या नावे आहेत त्रिशतके
कसोटीत दोन त्रिशतके ठोकणारे निवडक फलंदाज आहेत. यात सर डॉन ब्रॅडमनसह ब्रायन लारा, क्रिस गेल, सेहवाग यांचा समावेश आहे. रोहितने कसोटीत त्रिशतक ठोकले तर तो गेल, सेहवागसोबत अनोख्या क्लबमध्ये सामील होईल.
बातम्या आणखी आहेत...