आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याच्या त्रिकुटावर कारवाई; पाठीशी घालणार नाही- शिर्के

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गोवा क्रिकेट असोसिएशनच्या भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कृष्णकृत्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कधीही पाठीशी घालणार नाही, मात्र तेथील क्रिकेट सेंटरची आबाळ होणार नाही, तेथील क्रिकेटचे नुकसान होणार नाही, ते थांबणार नाही याची काळजी बीसीसीआय घेईल, असे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी सांगितले.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि कोशाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी एकत्रितपणे भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या त्रिकुटाने पणजीच्या डेव्हलपमेंट क्रेडिट बँकेत २००७ च्या एप्रिल महिन्यात गोवा क्रिकेट असोसिएशनच्या नावाने वेगळे खाते उघडले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कोटी ८७ लाख रुपयांचा चेक वटवला त्या पैशांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले.

देसाई फडके यांनी गोवा क्रिकेट संघटनेच्या खात्यातून २६ लाखांचा धनादेश काढला ‘हॅको’ कंपनीला दिल्याचे नमूद केले. प्रत्यक्षात ते पैसे त्या कंपनीला मिळालेच नाहीत, असाही आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

संबंधित विभाग अधिकारी कारवाई करतीलच. मात्र, बीसीसीआय अशा अपप्रवृत्तींना कधीही पाठीशी घालणार नाही. मात्र, हे तिघे जण दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच कडक कारवाई करण्यात येईल, असे शिर्के म्हणाले.

गोव्याचे क्रिकेट सुरक्षित चालावे क्रिकेट सेंटरचे कार्य बंद पडू नये, याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे लक्ष देईल, असेही शिर्के पुढे म्हणाले.