आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा वनडे: आज मालिका जिंकण्याच्या लक्ष्याने खेळणार टीम इंडिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- टीम इंडिया धोनीच्या गावात पोहाेचली आहे. झारखंड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चौथ्या वनडेत न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकण्याच्या लक्ष्याने मैदानावर उतरेल.

पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया सध्या २-१ ने पुढे आहे. दुसरीकडे पाहुण्या न्यूझीलंडसाठी हा “करा किंवा मरा’ अशा स्थितीचा सामना आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-२ ने बरोबरी करण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचे खेळाडू करतील.

रांचीच्या स्टेडियमवर टीम इंडिया अद्याप पराभूत झालेली नाही. येथे भारताने पैकी सामने जिंकले. एक सामना रद्द झाला. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली चांगल्या फॉर्मात आहेत. यामुळे सर्व दबाव न्यूझीलंडवर आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत असलेल्या भारतीय खेळाडूंवर निवड समितीने भरवसा दाखवला असून संघात बदल करण्यात आलेला नाही.

कोहली,रहाणे, रोहितची विश्रांती
सरावादरम्यानटीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि उमेश यादव दिसले नाहीत. या खेळाडूंनी हॉटेलात विश्रांती घेतली. धोनीने आपल्या युवा ब्रिगेडसह मैदानावर दोन तास घाम गाळला. धोनी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, केदार जाधव आणि मनीष पंाडे तसेच जयंत यादव यांनी वॉर्मअप केल्यानंतर फलंदाजी गोलंदाजीचा सराव केला.

किवी खेळाडूंचा सराव
न्यूझीलंडच्या खेळाडूंनी सकाळी कर्णधार झेल आणि स्ट्रेचिंगचा सराव केला. यानंतर ट्रेंट बोल्ट, जेम्स निशाम, मॅट हेनरी, सँटनर या गोलंदाजांनी विल्यम्सन, टेलर, कोरी अँडरसन यांनी फलंदाजीचा जोरदार सराव केला. फलंदाजीची लय मिळवण्यासाठी कोरी अँडरसनने मोठमोठे फटके मारले.

महेंद्रसिंग धोनी आणि कोहली दोघे शानदार खेळाडू आहेत. हे दोघे खेळपट्टीवर असतात तेव्हा त्यांना फलंदाजी करताना बघून बरेच शिकता येते. मी या दोघांचे अनुकरण करतो.
-हार्दिक पंड्या, अष्टपैलू, भारत.

टीम इंडिया मजबूत
टीम इंडिया मजबूत आहे. विजयासाठी आमच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. असे केले तरच भारतावर दबाव निर्माण करता येईल.
-टॉम लँथम, फलंदाज, न्यूझीलंड.

दोन्ही संभाव्य संघ
भारत: महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम लँथम, मार्टिन गुप्तिल, रॉस टेलर, ल्युक रोंची, मिशेल सँटनर, ईश साेढी, जिमी निशाम, कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साउथी, अंटोन डेविच, डग ब्रेसवेल, मॅट हेनरी, बी.जे.वॉटलिंग.
बातम्या आणखी आहेत...