आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धोनीसोबत खेळलेल्या या क्रिकेटरचे भारतीय संघात पदार्पण, पंड्यासाठी आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भुवनेश्वर कुमारने लग्नासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. त्याच्या जागी टीममध्ये तामिळनाडूचा क्रिकेटर विजय शंकरला घेण्यात आले आहे. या निवडीवर विजय देखील हैराण झाला आहे. इतक्या लवकर भारतीय संघात पदार्पण होईल याचा विचारही केला नव्हता असे तो म्हणाला. इंडिया-ए कडून खेळणाऱ्या विजयच्या परफॉरमन्समध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या सुधारणा पाहून त्याची निवड करण्यात आली आहे. 

 

धोनीसोबत खेळला हा क्रिकेटर
> विजय शंकर भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक एम.एस. धोनीसोबत खेळलेला आहे. 2014 मध्ये विजय आयपीएलच्या चेन्नई सुपकिंग्स संघात होता. 
> आयपीएलमध्ये त्याला एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. धोनी त्यावेळी चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन होता. 2015 पर्यंत धोनी या टीममध्ये होता. 
> 2016 च्या आयपीएल लिलावात विजयला सनरायझर्स हैदराबादने घेतले होते. तरीही त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. 2017 च्या आयपीएलमध्ये त्याने 4 सामने खेळले. 

हार्दिक पंड्याला टक्कर कशी?
- विजय शंकर आणि हार्दिक पंड्या हे दोघेही ऑलराउंडर आहेत. विजय राइट आर्म मिड पेसर तर पंड्या सुद्धा फास्ट बॉलर आहे. 
- ऑलराउंडर असल्यानेच हार्दिक पंड्याला टीममध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या तो रेस्ट करत आहे. अशात विजयला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतल्यास टीम मॅनेजमेंट हार्दिकला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवू शकते. अर्थातच टीमला हार्दिकचा पर्याय विजयच्या रुपात मिळाला आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...