आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केली मस्करी, मैत्रिणीला वाटले प्रपोज केला, अशी आहे सहवागची Love Story

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन टीमचा माजी ओपनिंग बॅट्समन विरेंद्र सहवाग 20 ऑक्टोबर रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. विरुने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीला जोडीदार म्हणून निवडले. सहवाग आणि पत्नी आरती एकमेकांचे नातेवाइक होते. 14 वर्षे ते मित्र-मैत्रिण होते. यानंतर सहवागने तिला लग्नासाठी प्रपोज केले. 

आरतीची आत्या आणि सहवाग दीर-भावजई
- आरतीच्या थोरल्या बहिणीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की विरू आणि आरतीचा विवाह कुटुंबातच झाला होता. 
- आरतीच्या आत्याचे लग्न सहवागच्या कुटुंबातील एका चुलत भावाशी झाले होते. 
- या लग्नानंतरच आमच्या आत्या आणि सहवाग दीर-भावजई झाले होते. 
- या लग्नाच्या वेळी सहवागचे वय 7 आणि आरतीचे वय 5 वर्षे होते. 

मस्करी म्हणून केले प्रपोज...
- 14 वर्षांच्या मैत्रिनंतर सहवागने सहज मस्करी करताना विनोदी पद्धतीने मे 2002 मध्ये आरतीला प्रपोज केले. 
- मात्र, आरतीला तो मस्करी करत असल्याचे कळालेच नाही. ती भावूक झाली आणि लगेच लग्नासाठी होकारही दिला. ती मस्करी होती हे फक्त सहवागला माहिती होते. एका मुलाखतीमध्ये त्याने हसत-हसत हा खुलासा केला होता.  
- यानंतर 3 वर्षे दोघांनी डेट केले आणि एप्रिल 2004 ला लग्न केले. 
- सहवाग आणि आरती यांना दोन मुले आहेत. दोघेही क्रिकेट खेळतात. क्रिकेटमधून सन्यास घेतल्यानंतर सहवाग कॉमेंट्री आणि सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो.
 
बातम्या आणखी आहेत...