आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहीर, भज्जीसह 7 क्रिकेटर्स, ज्यांना पस्तिशीनंतर मिळाली अर्धांगिणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी स्टार क्रिकेटर जहीर खान आज आपला 40 वाढदिवस साजरा करत आहेत. जहीर टेस्ट क्रिकेटमध्ये कपिल देव नंतर दुसरा सर्वात यशस्वी बॉलर मानला जातो. महाराष्ट्रातील श्रीरामपूरचा रहिवाशी असलेल्या जहीरने 2004 ते 2014 पर्यंतच्या टेस्ट वनडे आणि टी-20 सह सर्वच फॉरमॅट्समध्ये जबरदस्त परफॉर्म केले आहे. 
 

IPL मध्येही उत्तुंग कामगिरी...
- जहीरच्या वडिलांचे नाव बख्तियार खान आणि आईचे नाव जाकिया असे आहे. जहीरला धाकटा आणि थोरला असे दोन भाऊ आहेत. 
- जहीरने श्रीरामपूरच्या न्यु मराठी प्रायमरी स्कूल आणि के.जे. सोमय्या सेंकडरी स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 
- पुण्यात क्रिकेट करिअरची सुरुवात करण्यापूर्वी जहीरने श्रीरामपूरच्या रेव्हेन्यू कॉलोनी क्रिकेट (RCC) कडूनही खेळले आहे. 
- जहीरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये 610 इंटरनॅशनल विकेट्स घेतल्या. यातील 311 टेस्ट, 282 वनडे आणि 17 टी-20 विकेट्सचा समावेश आहे.
- भारताचा स्टार क्रिकेटर राहिलेल्या जहीरने ऑक्टोबर 2015 मध्ये फर्स्ट क्लास आणि इंटरनॅशनल दोन्ही क्रिकेट फॉरमॅटमधून सन्यास घेतला. 
- IPL करिअरमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेणारा जहीर जगात 10 वा आणि भारतात 8 वा बॉलर आहे. वयाच्या 38 व्या वर्षी असा विक्रम करणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. 
- जहीरने IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेयरडेविल्सकडून खेळले आहे. 2016 आणि 2017 मध्ये त्याने दिल्ली संघाचे कर्णधार पद सुद्धा भूषविले आहे. 
 

पस्तिशीनंतर बोहल्यावर...
- जहीर खानने वयाच्या 40 व्या वर्षात पदार्पण केला आहे. तरीही अद्याप लग्न केले नाही. त्याची एंगेजमेंट नुकतीच अभिनेत्री सागरिका हिच्या झाली असून लवकरच विवाह करणार आहे. 
- एप्रिल 2017 मध्ये आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून त्याने सागरिका घाटगे आणि आपला फोटो शेअर केला होता. 
- यापूर्वी त्याचे अफेअर अभिनेत्री ईशा शरवानीसोबत सुरू असल्याचे वृत्त झळखले होते. त्यांना अनेकवेळा वेग-वेगळ्या ठिकाणी एकत्रित पाहण्यात आले होते. यानंतर त्यांचे ब्रेक-अप झाले.
- पस्तिशीनंतर विवाह करणारा जहीर खान एकटा नाही. त्यापूर्वी अनेक खेळाडूंना पस्तिशीनंतरच आपला जोडीदार मिळाला. त्यापैकी काहींचे ते दुसरे लग्नही होते. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हे आहेत पस्तिशीनंतर बोहल्यावर चढणारे इतर क्रिकेटर्स...
बातम्या आणखी आहेत...