आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटर युवराज सिंह विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल, 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज आणि आई... - Divya Marathi
युवराज आणि आई...
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजच्या वहिणी आकांक्षा शर्मा यांनी हा आरोप केला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आकांक्षाच्या वकील स्वाती सिंह यांच्या मार्फत पति जोरावर सिंह, सासू शबनम सिंह आणि दीर युवराज सिंह यांच्या विरुद्ध ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 
 
यामुळे युवराजवर केस...
युवराजच्या आई शबनम यांनी नुकतेच आकांक्षा विरोधात एक तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये लग्नात दिलेली ज्वेलरी आणि इतर साहित्य परत देण्याची मागणी करण्यात आली होती. कौटुंबिक हिंसाचाराचा अर्थ केवळ शारीरिक हिंसाचार नसतो. याचा संबंध मानसिक आणि आर्थिक पिळवणुकीशी देखील आहे. त्यामुळेच युवराजवर सुद्धा हा खटला लागू केला जात आहे. कारण, आकांक्षाशी चुकीचे वर्तन होत असताना युवराज शांत होता असे आकांक्षाच्या वकील स्वाती यांनी म्हटले आहे.
 
 
आणखी कोणते आरोप
वकील  स्वाती यांनी सांगितल्याप्रमाणे,  आकांक्षावर तिच्या सासरची मंडळी मूल जन्माला घालण्यासाठी दबाव टाकत होते. त्यावेळी युवराजने कुटुंबियांच्या होकारात होकार दिला. जोरावर आणि युवराजच्या आई या दोन्ही मुलांच्या प्रत्येक निर्णयात हस्तक्षेप करतात. जोरावर आणि आकांक्षा एकत्रित राहत असताना देखील शबनम यांनी वेळोवेळी कुठल्याही निर्णयात त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केला. 
बातम्या आणखी आहेत...