आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेश दौऱ्याच्या टीममधील धवल कुलकर्णीचा साखरपुडा, शेअर केले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेश दौऱ्यासाठी भारताच्या वन डे टीमध्ये समावेश करण्यात आलेल्या धवल कुलकर्णीने त्याची मैत्रिण श्रद्धा खरपुडे हिच्याशी साखरपुडा केला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याबाबत माहिती दिली. धवल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रणजी चषकात मुंबईकडून खेळतो.

राहाणेने दिल्या शुभेच्छा
धवलने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची असणारी व्यक्ती, आयुष्यभर तुमच्यासोबत असेल यापेक्षा आणखी चांगले काय.. अशी पोस्ट त्याने केली. राजस्थान रॉयल्सधील त्याचा सहकारी असलेल्या अजिंक्य राहणेनेही त्याचा फोटो त्याच्या अकाऊंटवर शेअर करत त्याचे अभिनंदन केले.

भारतासाठी खेळला चार सामने
धवलने टीम इंडियासाठी 4 वनडे सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यात त्याने 8 विकेट घेतल्या आहेत. तसेच बांग्लादेशला जाणाऱ्या भारतीय वनडे टीममध्येही त्याचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल 8 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या वतीने खेळताना त्याने 11 सामन्यांत 13 विकेट घेतल्या.

पुढील स्लाइड्सवर पाहा, धवल आणि श्रद्धा यांचे PHOTOS...