आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoni And Company Gear Up For Three match ODI Series Against Bangladesh

धोनी वनडेसाठी सज्ज; टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी उत्सुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होत असलेल्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सज्ज झाला आहे. कसोटी खेळल्यानंतर टीम इंडियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर आठ खेळाडू वनडे खेळण्यासाठी ढाका येथे पोहोचले आहेत.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीशिवाय टीम इंडियात दाखल होणाऱ्या खेळाडूंत स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुरेश रैना, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी, अंबाती रायडू यांचा समावेश आहे. पावसाचा व्यत्यय असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करून यजमान बांगलादेशला फॉलोऑनसाठी बाध्य केले. यामुळे भारतीय संघातील खेळाडू मानसिकरीत्या मजबूत असतील. कसोटीनंतर आता वनडेही भारताकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. मायदेशी परतणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघाने निरोप दिला, असे टीम इंडियाचे मॅनेजर विश्वरूप डे यांनी सांगितले. "द डेली स्टार'ने डे यांचा संदर्भ देऊन म्हटले की, टीम इंडियाने सोमवारी सायंकाळची वेळ बाहेर घालवली. चांगल्या कामगिरीमुळे खेळाडूंनी जल्लोष केला. काही खेळाडू मायदेशी परत जाणार असल्याने या सर्व खेळाडूंचा एकत्रित शेवटचा दिवस होता. यामुळे सर्वांनी सहभाेजन घेतले, असे त्यांनी म्हटले.

भारताने २०१४ मध्ये यापूर्वीची वनडे मालिका खेळली होती. त्या वेळी सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-० ने विजय मिळवला होता. मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. पुन्हा बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकण्याचा टीमचा प्रयत्न असेल.

टीम इंडियाचे शक्तिस्थान
> जबरदस्त फलंदाजी फळी हे टीम इंडियाचे शक्तिस्थान आहे. सलामीला स्फोटक रोहित शर्मा, शिखर धवन असतील. रोहितच्या नावे वनडेत दोन द्विशतकांचा विक्रम आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. याशिवाय वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्या नावे आहे.

>मधल्या फळीत तडफदार कोहली अाहे. तो एकटा सामना फिरवू शकतो.
>त्यानंतर सुरेश रैना, रहाणे, धोनी, जडेजा, स्टुअर्ट बिन्नी असे फलंदाज असतील.
> गोलंदाजीची मदार उमेश यादव, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, अश्विनवर. अष्टपैलू म्हणून जडेजा, स्टुअर्ट बिन्नी.

वर्ल्डकपनंतर पहिला सामना
वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला. यानंतर टीम इंडिया गुरुवारी पहिला वनडे खेळेल. वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला असला तरीही स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत जबरदस्त व विरोधी संघांच्या मनात धडकी भरणारी अशीच होती. वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या संघात एकच बदल झाला आहे. जखमी मो. शमीच्या जागी धवल कुलकर्णीला संधी मिळाली. असे असले, तरीही त्याला अकरात संधी मिळू शकणार नाही.
भारताच्या टॉप-५ ची कामगिरी
खेळाडू मॅच धावा १००/५०
महेंद्रसिंग धोनी २६२ ८४९९ ६/३३
विराट कोहली १५८ ६५३७ २२ /३३
सुरेश रैना २१५ ५३८८ ५/३५
अजिंक्य रहाणे ५४ १५८४ २/९
शिखर धवन ६१ २५०७ ८/१२

वनडेचा भारतीय संघ असा :
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, धवल कुलकर्णी, अंबाती रायडू, अक्षर पटेल.

टीम इंडियाचा कसून सराव
बांगलादेशात दाखल झाल्यानंतर धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघातील खेळाडूंनी नेटवर कसून घाम गाळला. सर्व खेळाडूंनी मीरपूरच्या स्टेडियमवर सराव केला. यादरम्यान धोनी फ्रेश आणि रिलॅक्स मूडमध्ये दिसला. या वेळी टीम डायरेक्टर रवी शास्त्रीसुद्धा उपस्थित होते.