आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरच्या लष्करी शाळेत अचानक पोहोचला एम.एस. धोनी, चिमुकल्यांची घेतली भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - इंडियन क्रिकेटर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनी बुधवारी अचानक श्रीनगगर येथील आर्मी पब्लिक स्कूलला पोहोचला. धोनीच्या या सरप्राइझ विझिटवर शाळेतील चिमुकले किती खुश होते, हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. चिनार कॉर्प्सने धोनीच्या या दौऱ्याचे काही फोटोज सोशल मीडियावर गुरुवारी पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये लहान मुलांना शिक्षणासोबतच खेळणेही तितकेच महत्वाचे आहे असा संदेश धोनीने दिल्याचे लिहिले आहे. 

 

> आर्मी पब्लिक स्कूलमध्ये धोनी येणार हे तेथील विद्यार्थ्यांना माहितीच नव्हते. धोनी बादामीबाग येथील चिनार कॉर्प्स मुख्यलयात गेला होता. या ठिकाणी आर्मी पब्लिक स्कूल आहे. त्याने विद्यार्थ्यांशी संवादही साधला. 
> चिनार कॉर्प्सने या दौऱ्याचे फोटोज आपल्या ट्विटर पेजवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये धोनीने दिलेला सल्ला देखील लिहिला. धोनीने लहान मुलांशी संवाद साधताना अभ्यासासोबतच खेळणेही तेवढेच महत्वाचे आहे असे मुलांना सांगितले. 
> उल्लेखनीय बाब म्हणजे, 2011 मध्ये भारतीय लष्कराने धोनीला लेफ्टनंट कर्नलचे मानद पद दिले आहे. हे पद आणि रँकिंग मिळवणारा धोनी कपिल देवनंतर दुसरा क्रिकेटर आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...