आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षी-जीवासोबत दिवाळी साजरी करणार धोनी, स्वतः ड्राइव्ह करून पोहोचला इथे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानतळावरून घरी जाताना धोनी... - Divya Marathi
विमानतळावरून घरी जाताना धोनी...
स्पोर्ट्स डेस्क - इंडियन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोमवारी रांचीत पोहोचला आहे. त्याच्यासोबत पत्नी साक्षी आणि मुलगी झीवा देखील होती. धोनीला एयरपोर्टवर पाहणाऱ्यांनी त्याचे फोटोज आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. त्यांना प्रतिसाद देत धोनीने देखील हात दाखवले. धोनी दिवाळी साजरी करण्यासाठी रांचीत आला आहे. 
 

फॅमिलीसोबत साजरी करणार दिवाळी...
- महेंद्र सिंह धोनी आपल्या मित्र-परिवारासोबत नव्या फार्म हाऊसवर पोहोचून दिवाळी साजरी करणार आहे. 
- धोनीने 22 ऑक्टोबर रोजी न्युझीलंडविरुद्ध वनडे खेळण्यापूर्वी याच ठिकाणी राहणार आहे. 20 ऑक्टोबर रोजी तो रांचीहून मॅचसाठी रवाना होणार आहे. 
 

असा आहे धोनीचा नवीन फार्म हाऊस
- रांचीत महेंद्र सिंह धोनीने आपला पत्ता बदलला आहे. धोनी आपल्या समस्त कुटुंबियांसह रिंग रोड येथे 7 एकरावर बांधलेल्या फार्म हाऊसवर पोहोचला आहे. 
- हे फार्म हाऊस तयार होण्यासाठी तीन वर्षे लागली आहेत. अनेकवेळा सामन्यांमुळे बाहेर राहणाऱ्या धोनीचे घर बांधण्यासाठी त्या ठिकाणी नेहमीच धोनीचा मित्र सिमांत लोहानीने मदत केली. 
- यापूर्वीही धोनी आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी याच ठिकाणी येत होता. आता त्याने या जागेला महलाचे स्वरुप दिले आहे. 
- रांचीच्या एका छोट्याशा घरात धोनीचे बालपण गेले. या दरम्यान तो विविध स्टाफ क्वार्टर्समध्ये राहत होता. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, धोनीच्या फार्म हाऊसचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...