आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघे देशाचा संघ कसा निवडतील?, निवड समितीच्या सूचनेवर आक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- न्यायमूर्ती लोढा समितीने बीसीसीआयची आताची निवड समितीची प्रक्रिया, प्रणाली रद्द करून तीनसदस्यीय समितीची सूचना केली आहे. ही तीनसदस्यीय समिती संपूर्ण भारताचा संघ कसा काय निवडू शकेल, असा प्रश्न माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि किरण मोरे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना उपस्थित केला.

न्या. लोढा समितीने भारतीय संघांची, राज्य संघांची, विभागीय संघांची निवड समिती कशी असावी याबाबतही स्वत:चे निष्कर्ष ठरवले आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या लाखो क्रिकेटपटूंची गुणवत्ता हेरण्यासाठी सध्याची पाच विभागवार निवड समिती सदस्यांची निवड समिती अमान्य करून तीन जणांकडे निवडीची जबाबदारी सोपवण्याची सूचना समितीने केली आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आपल्या देशाच्या क्रिकेटपटूंची निवड कसोटी क्रिकेट खेळलेल्या माजी क्रिकेटपटूंनीच करावी, असेही सुचवण्यात आले आहे. कर्णधार निवडीबाबत निवड समितीचे एकमत झाल्यास समितीच्या अध्यक्षांनी मत देऊन कर्णधार निवडावा आणि खेळाडूंच्या निवडीबाबत एकमत झाल्यास कर्णधाराने आपल्या मताने खेळाडू निवडावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

...तर समान मते कशी पडणार?
तीन सदस्यांच्या समितीत समान मते कशी पडणार? निवड समितीचेच जर एखाद्या खेळाडूबाबत एकमत होत नसेल, तर त्यांनी निवडलेला कर्णधार त्यांच्या मतांचा अनादर करून खेळाडू निवडू शकतो का?

सध्या, आपापल्या विभागांच्या क्रिकेट संघटनांच्या ज्येष्ठ निवड समिती सदस्यांमधूनच त्या-त्या विभागाचा निवड समिती सदस्य निवडला जातो. प्रत्येक विभागाने एकमताने निवडलेल्या सदस्यालाच राष्ट्रीय निवड समितीवर जाता येते. प्रत्येक सदस्याचा आपापल्या विभागातील सदस्यांशी संपर्क असतो. त्यामुळे गुणवान खेळाडू कुणाच्याही नजरेतून सुटत नाही.

विभागवार निवड समिती प्रभावी : वेंगसरकर
निवड समितीबाबत आपला अनुभव सांगताना माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर म्हणाले, ‘मी अध्यक्ष असताना १४, १६, १९ २२ वर्षांखालील निवड समितीच्या बैठकांनाही मुद्दाम उपस्थित असायचो. कारण देशाच्या पाचही विभागांच्या निवड समिती सदस्यांकडून दर्जेदार खेळाडूची माहिती मला मिळायची. त्यामुळे मला विराट कोहली, ईशांत शर्मा, पार्थिव पटेल, इरफान पठाण यांच्यासारखे खेळाडू लवकर ओळखता आले. बीसीसीआयची पाच विभागवार निवड समिती सदस्यांच्या नियुक्तीची यंत्रणा इतकी प्रभावी होती.’ वेंगसरकर पुढे म्हणाले, आपल्या देशातील खेळाडूंची संख्या एवढी प्रचंड आहे की सर्वांपर्यंत तुम्हाला पोहोचताच येणार नाही. त्यामुळे पाच सदस्य आपापल्या विभागाच्या खेळाडूंची पारख करू शकतात. त्या काळी दालमिया यांनी नियुक्त केलेल्या ‘टॅलेंट रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर’ या योजनेचा लाभ भारताला झाला छोट्या छोट्या गावांत लपलेले गुणवत्तावान खेळाडू हुडकून त्यांना पुढे संधी देता आली. माजी निवड समिती सदस्य संजय जगदाळे यांचा निवड समिती सदस्यांचा ‘फॉर्म्युला’ यशस्वी असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत त्याला बदलणे कितपत योग्य आहे?

तीन नव्हे, किमान सदस्यीय समिती असावी : किरण मोरे
माजी निवड समिती सदस्य किरण मोरे यांनी मात्र तीनऐेवजी सदस्यांच्या निवडीला अनुकूलता दर्शवली आहे. मात्र, केवळ शिफारशींवर अवलंबून राहता खेळाडूंना तुम्ही प्रत्यक्ष पाहणे अधिक गरजेचे आहे, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे. फक्त कसोटी खेळलेला माजी क्रिकेटपटू सीनियर संघ निवडू शकतो, या सूचनेबाबतही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निवड समिती सदस्याला खेळाडूंची गुणवत्ता ओळखण्याची दृष्टी हवी. त्यासाठी तो कसोटी खेळणे अत्यावश्यक आहे का, असा प्रश्न, लोढा समितीने निवड समिती सदस्यांबाबत केलेल्या शिफारशींबाबत उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...