आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅगस्टमध्ये कार्तिक-दीपिका बाेहल्यावर! दाेन वेळा हाेणार लग्न, दाेन धार्मिक विधींचा वापर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील दाेन अव्वल खेळाडू अागामी अाॅगस्ट महिन्यात बाेहल्यावर चढणार अाहेत. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू दिनेश कार्तिक अाणि अव्वल स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकल यांनी विवाहबद्ध हाेण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवसांपासून यांच्यात प्रेमप्रकरण सुरू अाहे. त्यामुळे अाता दाेघेही अाॅगस्टमध्ये विवाहबद्ध हाेतील. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दबक्या अावाजातील चर्चांना पूर्णविराम मिळणार अाहे.

अागळावेगळा विवाहसाेहळा
दीपिका अाणि दिनेश कार्तिक यांच्यातील विवाहसाेहळा हा अागळावेगळा ठरणारा असेल. दाेन वेळा हे दाेघेही विवाहबद्ध हाेतील. दीपिका ही ख्रिश्चन धर्मीय अाहे, तर दिनेश हा हिंदूधर्मीय अाहे. त्यामुळे दाेघांच्या धार्मिक विधीनुसार हा विवाहसाेहळा पार पडणार अाहे. येत्या १८ अाॅगस्ट राेजी खिश्चन धर्मातील रीतिरिवाजानुसार अाणि त्यानंतर दोन दिवसांनी २० अाॅगस्ट राेजी हिंदूधर्मीय पद्धतीने हा साेहळा पार पडणार अाहे.

तीन वर्षांपूर्वी अाणाभाका
दीपिका पल्लीकल व दिनेश कार्तिक हे दाेघे मागील तीन वर्षांपासून एकमेंकाना अाेळखतात. गत २०१३ मध्ये या दाेन्ही खेळाडूंची भेट झाली. त्यानंतर अाेळखीचे रूपांतर काही दिवसांतच प्रेमात झाले. त्यानंतर एका वर्षातच त्यांचा साक्षगंधदेखील झाला. अाता हे दाेघेही विवाहबद्ध हाेणार अाहेत.

मुरलीमुळे जीवनात ट्विस्ट...!
मुरली विजयमुळे कार्तिकच्या अाधीच्या वैवाहिक जीवनामध्ये ट्विस्ट अाहे. दिनेशने निकितासाेबत २००७ मध्ये लग्न केले हाेते. त्याच्याकडे मित्र मुरली विजय याचे येणे-जाणे हाेते. यातून मुरली व निकिता यांच्यात प्रेमसंबंध जुळून अाले. त्यामुळे कार्तिकने निकिताला साेडचिठ्ठी दिली. घटस्फाेटानंतर निकिता व मुरली विवाहबद्ध झाले.

दुस-यांदा बाेहल्यावर
दिनेश कार्तिक हा दुस-यांदा बाेहल्यावर चढत अाहे. त्याचे यापूर्वी अापली बालपणीची मैत्रिण निकितासाेबत लग्न झाले हाेते. मात्र, त्यानंतर दाेघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. अखेर त्या दाेघांनीही वेगळे हाेण्यासाठी घटस्फाेटाचा निर्णय घेतला.