आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Basketball Tournament DNYANESHWAR Model High School Won

जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत ज्ञानेश्वर, मॉडेल हायस्कूल विजयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमएसएम बास्केटबॉल जिल्हा बास्केटबॉल संघटनेतर्फे आयोजित स्व. शंकरराव चव्हाण जयंती दिनानिमित्त बास्केटबॉल स्पर्धेत ३९ संघांनी सहभाग नोंदवला. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात ज्ञानेश्वर विद्यालय, मॉडेल इंग्लिश हायस्कूल, लिटल फ्लॉवर संघांनी विजयी सुरुवात केली. स्पर्धेतील सामने साखळी बाद पद्धतीने होणार आहेत.
ज्ञानेश्वर विद्यालयाने सेंट फ्रान्सिसचा २४-१३ अशा बास्केट गुणांनी पराभव केला. दुसऱ्या लढतीत मॉडेल हायस्कूलने टेंडर केअर होम संघाला ३५-१८ गुणांनी सहज हरवले. लिटल फ्लॉवरने एमएसएम क्लबला २४-१६ ने नमवले. मुलांच्या १४ वर्षांखालील गटात एमएसएम क्लबने स्वाभिमान क्रीडा मंडळावर ३०-११ ने मात केली. रोमांचक लढतीत छत्रपती संभाजी क्रीडा मंडळाने टेंडर केअर संघावर अवघ्या एका गुणाने विजय मिळवला. स्पर्धेच्या उद्््घाटनप्रसंगी डॉ. मकरंद जोशी, गणेश कड, प्रशांत बुरांडे, अभय चव्हाण, सय्यद रफिक, विश्वास कड यांची उपस्थिती होती.