आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गांगुलीमुळे द्रविडचा समितीला नकार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांसारखे दिग्गज खेळाडू भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, यात एक नाव गायब आहे, ते म्हणजे राहुल द्रविडचे. बीसीसीआयच्या माहितीनुसार द्रविडने स्वत:हून या समितीमध्ये दाखल होण्यास नकार दिला आहे. द्रविड या समितीमध्ये न आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणांमुळे द्रविडने समितीमध्ये येण्यास नकार दिला असला तरीही हे खरे कारण नाही. गांगुली या समितीमध्ये असल्याने द्रविडने नकार दिल्याची चर्चा आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार द्रविडचे उत्तर नकारात्मक येईल, याची बीसीसीआयला अपेक्षा होती. कारण, गेल्या वर्षभरापासून गांगुली आणि त्याच्यात मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. मागच्या वर्षी सचिनचे पुस्तक प्रकाशित झाले त्या वेळी दोघांत मतभेद झाल्याचे बोलले जाते. "माजी कोच ग्रेग चॅपल गांगुलीला दूर करून सचिनला कर्णधार करू इच्छित होते. त्यांच्या या योजनेची माहिती द्रविडला होती,' असे त्या वेळी गांगुलीने म्हटले होते. द्रविडला सर्वाधिक वादग्रस्त कोच चॅपल यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दरम्यान, द्रविड बीसीसीआयसोबत नव्या भूमिकेत जुळू शकतो, अशीही चर्चा आहे.