आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Heart Disease James Taylor Take Retirement

हृदयाच्या आजारामुळे जेम्स टेलरची निवृत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडचा युवा फलंदाज जेम्स टेलरला हृदयाच्या गंभीर आजारामुळे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने मंगळवारी ही माहिती दिली. मधल्या फळीचा फलंदाज जेम्स टेलरने इंग्लंडसाठी ७ कसोटी सामने आणि २७ वनडे खेळले आहेत. आयर्लंडविरुद्ध मागच्या मे महिन्यात त्याने एका सामन्यात नेतृत्वसुद्धा केले होते. नॉर्टिंघमशायरसाठी कौंटीत खेळणाऱ्या जेम्सने मागच्या आठवड्यात केम्ब्रिज एमसीसीयूविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली होती. त्या वेळी व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे वाटत होते. नंतर करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये जेम्सला हृदयाचा गंभीर आजार असल्याचे कळले. या आजाराला एराइथमॉजेनिक राइट व्हेंट्रिक्युलर एराइथमिया म्हटले जाते. यानंतर जेम्स आपल्या ट्विटर अकाउंटवर ही माहिती दिली.

अत्यंत दु:खद बातमी:ईसीबी
ही अत्यंत दु:खद आणि धक्का देणारी बातमी आहे. जेम्सची कारकीर्द अचानक आणि अशा धक्कादायक पद्धतीने संपली आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंड संघाचे संचालक अँड्रयू स्ट्रॉस यांनी ईसीबीच्या एका प्रसिद्धिपत्रकात दिली.