आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड समितीमुळे सचिनची निवृत्ती! संदीप पाटलांचा गाैप्यस्फाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी पदावरून दूर झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अनेक निर्णयांच्या बाबतीतील गाैप्यस्फाेट करून खळबळ उडवून दिली. निवड समितीच्या कुटिल डावपेचामुळेच सचिनला वनडेतून निवृत्ती जाहीर करावी लागल्याचा गाैप्यस्फाेट त्यांनी केला. २०१२ मध्ये वनडेतून निवृत्ती घेण्याची सचिनची इच्छा नव्हती. मात्र, निवड समितीने त्याला टीमबाहेर करण्याचे ठरवले हाेते. त्यामुळे हा कुटिल डाव लक्षात अाल्याने सचिनने वनडेतील अापली निवृत्ती जाहीर केली. संदीप पाटील यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही खलबते उकल केली अाहेत.
‘२०१२ मध्ये नागपूर येथील इंग्लंडविरुद्ध कसाेटीदरम्यान सचिनची भेट घेतली. भविष्यातील याेजनांबाबत सचिनशी चर्चा केली. मात्र, त्याने निवृत्तीस साफ नकार दर्शवला हाेता. मात्र, निवड समिती टीममधून सचिनला बाहेर करण्याच्या निर्णयावर ठाम हाेती. याबाबत मंडळालाही सूचित करण्यात अाले हाेते. हा डावपेच लक्षात अाल्यानंतर सचिनने मंडळाच्या पुढच्या बैठकीत वनडेतील निवृत्तीचा निर्णय स्पष्ट केला,’ असेही पाटील म्हणाले.
अाता खुलासा : कसाेटीवरील लक्ष केंद्रित करण्याचा सचिनचा विचार हाेता. माझ्याशी अाणि जगदाळेशी दूरध्वनीवर चर्चा करताना त्याने हा मानसही व्यक्त केला, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...