आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Each Test Play Supposing Last Match Rohit Sharma

प्रत्येक कसोटी शेवटचीच समजून खेळतो : रोहित शर्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मला माझ्यासाठी खेळायचे आहे, देशासाठी खेळायचे आहे. कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. मात्र, एकदिवसीय सामन्यात खेळल्यानंतर तब्बल ६ वर्षांनी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर कसोटी पुनरागमनासाठीही तब्बल ४ वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे कसोटीतील स्थान सहजासहजी मिळत नाही, याची जाणीव मला आहे, असे उद्गार भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने काढले.

रोहित शर्माने व्यक्त केलेल्या भावना अशा....
>कसोटीचे स्थान सहजासहजी मिळत नाही. आता तर नाजूक परिस्थिती आहे. प्रत्येक कसोटी शेवटची आहे, असे समजूनच मी खेळतो. श्रीलंकेतही सारं काही सहज साध्य होणार नाही.
>भारताबाहेर कसोटी खेळणे मोठे आव्हान असते, अशी आव्हाने घेऊन खेळण्यात आणि चांगली कामगिरी करणे मला आवडते.
>श्रीलंकेतील मैदाने भारतासारखीच, संथ व फिरकी गोलंदाजीला साथ देणारी आहेत. त्यामुळे तेथे काय करायचे हे मला ठाऊक आहे.
>श्रीलंकेतील गत कामगिरीला माझा इतिहास उत्साहवर्धक नाही, याची जाणीव आहे. मात्र, त्यानंतर मी बराच परिपक्व झालो आहे.
>क्रिकेटमध्ये स्पर्धा महत्त्वाची. सतत स्पर्धात्मक वातावरणात राहणे हे आव्हानात्मक असते. मला स्पर्धा करून यशस्वी व्हायला आवडते. मी मैदानाबाहेर फारसा विचार करत नाही. जे काय करायचे आहे ते मैदानावर करतो. कारण मैदानावरच्या कर्तृत्वाची सर्वस्वी जबाबदारी ही आपलीच असते.
>कसोटी पदार्पण ही माझ्यासाठी मोठी घटना होतीच. त्यापेक्षाही आनंदाची गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकरच्या हस्ते मी कसोटी कॅप स्वीकारली होती. तो दिवस अजूनही मला आठवतो. तो क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे.
>कसोटीतील स्थान गमावायला कुणालाही आवडत नाही. मी सुद्धा स्थान टिकवण्याचा प्रयत्न करतोय.