आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदार जाधवने आठ महिन्यांनंतर केले यशस्वी पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदार जाधवने - Divya Marathi
केदार जाधवने
हरारे - झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा भारतीय फलंदाज केदार जाधवने िमळालेल्या संधीचे सोने झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

िनवडकर्त्यांनी मला चांगली संधी िदली, त्याचा पुरेपूर लाभ घेत मी उत्तम कामगिरी करू शकलो, याचाच आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया ३० वर्षीय फलंदाजाने िदली. आठ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या जाधवने संघाला संकटाच्या वेळी ८७ चंेडूंत १०५ धावांची खेळी केली. आधीच्या दोन्ही सामन्यांत त्याने अनुक्रमे पाच व १६ धावा केल्या होत्या.

केदारचे २०१४ मध्ये एकदिवसीय पदार्पण
घरगुती िक्रकेटमध्ये दणकेबाज कामगिरी केल्यानंतर जाधवने २०१४ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय िक्रकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने २० धावांची खेळी केली. यानंतर थेट झिम्बाब्वेत संधी मिळाली.
बातम्या आणखी आहेत...