आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Emirates Cabin Crew Thrilled The Crowd With A Special \'Welcome On board\'

#T20WorldCupfinalचा हा व्हिडिओ झाला व्हायरल, तासभरात लाखोंनी पाहिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- टी20 वर्ल्डकप चॅम्पियन ठरलेल्या वेस्ट इंडीजने मैदानावर एकच जल्लोष केला. विंडीजने शेवटच्या षटकात इंग्लडाचा 4 विकेटने पराभव करत थरारक विजय मिळवला. लढतीदरम्यान, अमीरात केबिनच्या एअर होस्टेसचा 'वेलकम' करण्‍याचा अंदाज सगळ्यांनाच आवडला. एअर होस्टेसचा 'वेलकम डान्स' सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'फेसबुक'वरील डान्सचा व्हिडिओ 10 लाखपेक्षा जास्त यूजर्सनी पाहिला आहे.

अनाउंसरने सांगितले अशी सेलिब्रेट करावी फायनल...
- टी 20 वर्ल्डकपची फायनल लढत सुरु होण्याआधी अमीरातच्या केबिन क्रू, एअर होस्टेसेस मैदानावर पोहोचल्या. त्यांनी आपला वेलकम डान्स सादर केला.
- एक मिनिट 18 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये फायनल सेलिब्रेट करण्याची पद्धत एअर होस्टेसने सांगितली.
- अनाउंसर म्हणाला, 'नमस्कार कोलकाता! अमीरात आपले ईडन गार्डनवर हार्दिक स्वागत करत आहे.'
- 'या स्टेडियमला 18 दरवाजे आहेत. 66000 फॅन्ससमोर दोन्ही संघ एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहे.'
- 'फायनल सेलिब्रेट कशी करावी, हे आपचे केबिन क्रू आता तुम्हाला सांगणार आहे.'
- 'जेव्हा सिक्स सेलिब्रेट करायचे असेल तर (एअर होस्टेसने हात वर करून सिक्सचा इशाराकेला. भांगड्यावर डान्स ही केला.)'
- 'जेव्हा फोर सेलिब्रेट करायचा असेल तर (एअर होस्टेस डान्स करत बाउंड्रीकडे इशारा केला) '
- 'विकेट सेलिब्रेशनदेखील दाखवले. (अंपायर ज्याप्रकारे आउट देतात, अगदी तशाच प्रकारे होस्टेसेस यांना हात वर करून आउट डान्स केला.)'
- अनाउंसर सगळ्यात शेवटी दोन्ही संघांना गुडलक म्हणतात व सर्व एअर होस्टेसेस निघून जातात. (पुढील स्लाइड्सवर पाहा वेलकम डान्सचा व्हिडिओ)

विंडीज प्लेयर्ससोबतही केला डान्स...
- अमीरातच्या क्रू केबिनने विजयोत्सवर साजरा करणार्‍या विंडीज प्लेयर्ससोबतही डान्स केला.
- ड्वेन ब्रावोचा चॅम्पियन डान्स देखील करताना एअर होस्टेस दिसल्या.

फुटबॉल मॅचदरम्यान डान्स करताना दिसल्या होत्या एअर होस्टेस...
- जर्मनीत एका फुटबॉल मॅचदरम्यान अमीरातच्या एअर होस्टेसेस, केबिन क्रू मैदानावर दिसल्या होत्या.
- डान्स करताना एअर होस्टेसेसनी गोल करणे व मॅच सेलिब्रेट करण्याची पद्धत सांगितली होती.

पुढील स्लाडवर पाहा, अमीरातच्या एअर होस्टेसेसचा मैदानावरील डान्स...