आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा विराटची वेडी झाली ही इंग्लिश क्रिकेटर, इंडियन फॅन्स लागले तिच्या मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - इंग्लिश वुमन क्रिकेट टीमची सदस्य डॅनी व्याट पुन्हा चर्चेत आहे. ती भारतात प्रामुख्याने विराटसाठी ओळखल्या जाते. यावेळी सुद्धा ती चर्चेत असण्याला हेच कारण आहे. तिने आपल्या बॅटवर विराटचे नाव लिहून त्याचा फोटो शेअर केला आहे. हे नाव लिहिताना तिने स्पेलिंग मिस्टेक केली आहे. मग काय, इंडियन फॅन्स तिच्या मागे हात धुवून लागले.
 

तिने नेमके काय लिहिले
- इंगलंडची महिला क्रिकेटर डॅनी हिला विराटकडून नुकतेच एक बॅट गिफ्ट म्हणून मिळाले होते. तिने या बॅटचा फोटो ट्वीट केला. तसेच लिहिले, की "या आठवड्यापासून मी ट्रेनिंग सुरू करणार आहे. ही खतरनाक वस्तू वापरण्यासाठी आता मी जास्त वाट पाहू शकणार नाही. थँक्स विराट कोहली."
- ज्या बॅटचा फोटो तिने जाहीर केला, त्या बॅटच्या खाली VIRAT KHOLI असे लिहले होते. 
- KOHLI च्या जागी KHOLI कसे वापरले असा सवाल करत भारतीय फॅन्स त्यावर तुटून पडले. 
- विराटचे फॅन्स चित्र-विचित्र आणि अतिशय फनी कॉमेंट्स करत आहेत. एका फॅनने तर विराट आणि डॅनीच्या स्टोरीची तुलना थेट लगान चित्रपटाच्या भुवन आणि एलिझाबेथ या पात्रांशी केली. 
 
 
विराटला प्रपोज करून आली चर्चेत
- डॅनी विराटला एप्रिल 2014 मध्ये चक्क लग्नासाठी प्रपोज करून चर्चेत आली होती. विराटच्या जबरदस्त बॅटिंगवर ती आकर्षित झाली होती. 
- त्यावेळी सुद्धा तिच्या ट्वीटवर हजारो भारतीयांनी अशाच प्रकारचे कॉमेंट्स केले होते. काहींनी तर विराट अनुष्का शर्माला पसंत करतो असे डॅनीला सांगितले होते. 
- यानंतरही डॅनी एका मॅच दरम्यान विराटची भेट घेण्यासाठी आली आणि त्याच्यासोबत फोटो देखील काढला होता. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंग्लिश फॅनला भारतीय चाहत्यांनी दिली अशी उत्तरे...
बातम्या आणखी आहेत...