आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BCCI ने कुंबळेला फक्त बॉलर म्हणून केले WISH, फॅन्सच्या संतापानंतर डिलीट केला ट्वीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि कोट अनिल कुंबळे आज आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्त बीसीसीआयने त्याला शुभेच्छा दिल्यावरून वादंग निर्माण झाला. त्यांनी कुंबळेला शुभेच्छा देताना त्याचा उल्लेख केवळ माजी बॉलर असा केला. त्यावरूनच कुंबळेचे फॅन्स बीसीसीआयवर खवळले आहेत. चाहत्यांचा राग पाहता, बीसीसीआयला आणखी एक ट्वीट करावा लागला. त्यामध्ये, त्यांनी कुंबळेचा उल्लेख Legend असा केला. 

ट्वीटमध्ये काय लिहिले BCCI?
- BCCI ने आपल्या ट्वीटमध्ये आधी लिहिले, टीम इंडियाचा माजी बॉलर अनिल कुंबळेला वाढदिवसाच्या शुभेच्छा...
 
 
विरोध कशाचा?
- BCCI च्या ट्वीटचा कुंबळेच्या चाहत्यांनी तीव्र विरोध केला. त्यापैकीच एक दिग्विजय सिंह देवने लिहिले, बॉलर? तो भारताचा माजी कॅप्टन आणि माजी कोच आणि सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटर नाही का? दुसऱ्या चाहत्यांनी सुद्धा कुंबळेचा आदर करावा असा सल्ला बीसीसीआयला दिला. 
- यानंतर क्रिकेट बोर्डाने लगेच आपले पहिले ट्वीट डिलीट केले. दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, 'टीम इंडियाचा कॅप्टन अनिल कुंबळेला हॅपी बर्थडे' यासोबतच ट्वीटमध्ये #legend असेही लिहिले.
बातम्या आणखी आहेत...