आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fate Of CSK, RR Tops Agenda In BCCI Working Committee Meeting On Sunday

आज चेन्नई, राजस्थानच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत रविवारी होणाऱ्या बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीत चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रँचायझींच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लोढा समितीने दोन्ही फ्रँचायझींवर बंदीच्या शिक्षेची शिफारस केली आहे.

अध्यक्ष मनोहर यांनी लोढा समितीच्या शिफारशींबाहेर काहीही करणार नाही हे स्पष्ट केले असले, तरीही श्रीनिवासन यांचे समर्थक चेन्नई व राजस्थानच्या बाजूने निर्णय व्हावा यासाठी प्रयत्नशील असतील, असा अंदाज आहे.

मात्र, वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीची ही अखेरची कार्यकारी समितीची बैठक असल्यामुळे वार्षिक जमा-खर्चाला मंजुरी देणे व वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित करणे या दोन गोष्टी अनिवार्य आहेत.