आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिंदी दिवस'वरच चुकीची हिंदी लिहून फसला सहवाग, चाहत्यांनी घेतली शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग आपल्या फनी ट्वीट्सवरूनही ओळखल्या जातो. आपल्या ट्वीटवरून तो नेहमीच चर्चेत असतो. यावेळी सुद्धा तो ट्वीटमुळेच चर्चेत आला तरीही त्याचे कारण फनी ट्वीट नसून चुकीची हिंदी आहे. त्याने ही चूक चक्क हिंदी दिवस निमित्त ट्वीट करताना केली आहे. यानंतर ट्वीटरवर लोकांनी त्याची शाळा घेण्यास सुरुवात केली. अनेकांनी विनोदी शैलीत सहवागला फटके दिले. 
 
 
सहवागने केली ही चूक
- हिंदी दिवसवर आपल्या ट्वीटमध्ये त्याने हिंदी भाषेचे कौतुक करताना काही ओळी लिहिल्या. त्यामध्येच सहवागने चूक केली आहे. 
- सहवागने ट्वीटच्या सुरुवातीलाच 'हिंदी' न लिहिता 'हिन्दि' असे लिहिले. यानंतर त्याची चूक पकडून फॅन्स त्याच्या मागे हता धुवून लागले. 
- नंतर सहवागने आपली चूक सुधारताना आणखी एक नवीन ट्वीट केले. मात्र, जुने ट्वीट डिलीट केले नाही. त्याऐवजी ट्वीटमध्येच 'हिन्दी' असे लिहून मोकळा झाला. 
- चूक सुधारण्यापूर्वीच सहवागचे ट्वीट व्हायरल झाले. त्याचे ट्वीट 1200 वेळा रीट्वीट करण्यात आले. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, फॅन्सने अशी घेतली सहवागची शाळा...
बातम्या आणखी आहेत...