आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Test Cricketer Hemant Kanitkar Passes Away

माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे निधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - माजी कसोटीपटू हेमंत कानिटकर यांचे मंगळवारी वयाच्या ७२ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. कानिटकर यांनी दोन कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्यांनी दोन वेळा पटकावला. १९७०-७१ च्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विंडीज विरुद्ध बंगळुरूमधील पदार्पणाच्या कसोटीत कानिटकर यांनी ६५ धावांची झुंजार खेळी केली होती. त्यानंतर १९७८ पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी कारकीर्दीत ५,००७ धावा केल्या. यात १३ शतकांचा समावेश आहे. त्यांचा मुलगा हृषीकेश कानिटकर यानेही दोन कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी आणि हृषीकेश व आदित्य ही मुले आहेत.