आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे माजी कर्णधार जहीर अब्बास आयसीसीचे नवे अध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारबडोस- पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जहीर अब्बास यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आयसीसीच्या वार्षिक परिषदेच्या तिसर्‍या दिवशी अध्यक्षपदासाठी जहीर अब्बास यांच्या नावाची घोषणा करण्‍यात आली.

बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी विश्वचषकादरम्यान उद्‍भवलेल्या वादानंतर आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त होते. जहीर अब्बास हे जुलै महिन्यापासून अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारतील. पुढील वर्षभर ते या पदावर राहतील.ऐहसान मणी यांच्यानंतर आयसीसीच्या अध्यक्षपद भूषवणारे जहीर अब्बास हे दुसरे पाकिस्तानी आहेत.

आयसीसीचे चेअरमन श्रीनिवासन यांनी जहीर अब्बास यांचे अभिनंदन केले आहे. जहीर अब्बास यांनी क्रिकेट खेळाला बहुमुल्य योगदान दिले आहे. ते क्रिकेटदूत आहेत. प्रामाणिक भावना आणि योग्य कौशल्याच्या जोरावर अब्बास यांनी आपली कारकिर्द गाजवल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जहीर अब्बास यांनी 1969 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. अब्बास यांनी 78 कसोटीत 5062 तर 62 वनडेमध्ये 2572 धावा केल्या. अब्बास यांनी 1975, 1979 आणि 1983 च्या विश्वचषकातही सहभाग घेतला होता. तसेच 14 कसोटी आणि 13 एकदिवसीय सामन्यास पाक क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले होते.