आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विराट-धोनी ते स्टोक्सपर्यंत या मराठी तरुणाच्या कामाचे फॅन आहेत क्रिकेटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेशच्या कामावर खुश होऊन धोनीने महेशला पैसे ऑफर केले होते... - Divya Marathi
महेशच्या कामावर खुश होऊन धोनीने महेशला पैसे ऑफर केले होते...
पुणेः IPL-10 मध्ये बेन स्टोक्सपासून ते राहुल त्रिपाठीपर्यंत जो तो धावांचा पाऊस पाडत आहे. परंतु या क्रिकेटर्सच्या बॅट्स रिपेअर करण्याचे काम पुण्यात एका छोट्याशा गल्लीत बॅट वर्कशॉप चालवणारा एक २५ वर्षीय तरुण करत आहे. त्याने आतापर्यंत जो रुट पासून ते विराट कोहलीचीही बॅटही रिपेअर केली आहे. त्याच्या या कामाने खुश होऊन अनेक क्रिकेटर्सने त्याचे कौतूकही केले आहे. अशी मिळाली संधी

- पुण्याच्या दापोलीमध्ये राहाणारे महेश रणसुभे (२५) शहरातील शुक्रवार पेठेच्या भागातील शिंदे गल्लीत बॅट रिपेअरींगची एक छोटीशी वर्कशॉप चालवतात.
- महेश त्याच्या आई-वडिलांसोबत दोपोलीमधील एका छोट्याशा घरात राहातो, तर त्याच्या दोनी बहिणींचे लग्न झाले आहे.
- चिंटू नावाने ओळखला जाणारा महेशच्या कामाचे कौतुक बेन स्ट्रोक ते धोनीपर्यंत सर्वांनीच केले आहे. या आयपीएल सिजनमध्येही अनेक क्रिकेटर्सच्या बॅट त्याच्याजवळ रिपेअरींगसाठी आल्या आहेत. 

महेशला क्रिकेटर बनायचे होते..
- महेशला क्रिकेटर बनायचे होते. लहानपणी त्याला क्रिकेटमुळे अनेकदा पालकांच्या रागाला सामोरे जावे लागत होते, मात्र त्याच्या जिद्दीपुढे त्याच्या घरच्यांनीही हात टेकले. 
- कॉलेजच्या दिवसांमध्ये त्याने पुण्याच्या पीवायसी जिमखानामधून क्रिकेटचा सराव सुरू केला. येथेच त्याला अनेक रणजी क्रिकेटर्ससोबत ओळखी झाल्या.
- क्रिकेट खेळता खेळता महेशने बॅट्स रिपेअरींगची कलाही शिकून घेतली. पाच वर्षांपूर्वी त्याने आयपीएल मॅचपूर्वी राहुल द्रविडसोबत नेटमध्ये बॉलिंग केली होती. 

आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने सोडावे लागले शिक्षण 
- महेशने १२ वी पर्यंतचे शिक्षण पुण्याच्या सिम्बॉयसिस कॉलेजमधून पुर्ण केले. यानंतर बीकॉमसाठी त्याने सिंहगड कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. 
- महेशचा शिक्षणापेक्षा क्रिकेटवरच जास्त फोकस होता, मात्र या दरम्यान त्याच्या वडिलांना व्यवसायात मोठा नुकसान झाला, त्यामुळे त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. 
- आता महेशसमोर दोनच पर्याय होते, एक तर क्रिकेटमध्येच करिअर बनवणे अथवा दुसरी नोकरी शोधणे. 
- महेशने एम कॉमच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण सोडून क्रिकेटशी संबंधीत असलेले बॅट रिपेअरींगचे काम सुरू केले. 
- सुरूवातीला तो लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या बॅट्स रिपेअर करायचा. या कामामुळे त्याची मोठ्याप्रमाणात माऊथ पब्लिसीटी झाली. 
- त्यानंतर मित्रांकडून पैसे ऊधार घेऊन दापोलीत एका फ्लॅटमध्ये त्याने स्वतःचा वर्कशॉप सुरू केला, मात्र रणजी आणि क्रिकेटर्ससाठी ते ठिकाण फार दूर होते. 
- क्रिकेटर्सच्या मोठ्या प्रमाणात मागणीनंतर त्याने शुक्रवार पेठेत भाड्याच्या एका ठिकाणी छोटासा वर्कशॉप सुरू केला. 

क्रिकेटर्सच्या बॅट रिपेअर करण्याची अशी मिळाली संधी 
- महेशने सांगितले की, त्याने सर्वात पहिले रजत भाटीया यांची बॅट रिपेअर केली होती, यानंतर राहुल त्रिपाठी यांचीही बॅट रिपेअर केली. 
- जानेवारीत इंग्लंट टीम पुण्यामध्ये वन डे मॅच खेळण्यासाठी आली होती. या दरम्यान केदार जाधव आणि इतर क्रिकेटर्सने धोनी आणि विराट कोहलीला महेशबद्दल सांगितले. 
- दोघांनीही त्यांच्या बॅट्स रिपेअर करण्यासाठी महेशला एमसीए स्टेडिअरवर बोलावले होते. तिथेच त्याला पहिल्यांदा धोनी आणि विराटच्या बॅटचे रिपेअरिंग करण्याची संधी मिळाली. 

जो रुट यांनी केले आहे कामाचे कौतूक 
-महेशने अनेकदा केदार जाधवची बॅट रिपेअर केली होती, याची माहिती जो रुट यांना मिळाली, तेव्हा त्यांनी स्वतःची बॅटही महेशकडून रिपेअर करून घेतली 
- महेशने तिथे क्रिकेटर्सच्या १२ बॅट्स रिपेअर केल्या, जो रुटने त्यांना गिफ्ट म्हणून ग्लव्ज आणि काही पैसे दिले. विराट आणि धोनीसुध्दा पैसे देत होते, मात्र महेशने त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. 
- महेशने आतापर्यंत आयपीएलचे सर्वात महागडे खेळाडून बेन स्टोक्स, जो रूट, विराट कोहली, राहुल त्रिपाठी, इमरान ताहिर, रविंद्र जडेजा, उमेश यादव, मनीष पांडे, इशांत शर्मा  यांच्या बॅट्स रिपेअर केल्या आहेत. 

धोनीला आवडते गोल बॅट
- महेशने सांगितले की, बहुतेक बॅटचा आकार खालच्या बाजूस चौकोनी असतो, मात्र धोनीला गोलाकार बॅट जास्त आवडते. 
- महेशला भविष्यात स्वतःच्या बॅटचा एक वेगळा ब्रॅंड बनवायची इच्छा आहे. तसेच स्वतःचे क्रिकेटर बनण्याचे अपूर्ण स्वप्न ही तो पूर्ण करू इच्छितो
- महेश म्हणतो, ''मला फार मोठा क्रिकेटर बनायचे नाही, परंतु ज्या खेळामुळे मला आत्मसमाधान मिळेल मी तसा क्रिकेटर बनेल''

पुढील स्लाईडवर पाहा, महेशचे इतर क्रिकेटर्स सोबतच्या काही आठवणी... 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...