आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉल टाकताना बॉलरच पळाला, वाचा आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील फनी किस्‍से

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टी 20 विश्‍वचषक स्‍पर्धेची सांगता होताच आयपीएल सामन्‍याला सुरुवात झाली. परिणामी, देशात क्रिकेटचा ज्‍वर चढाच आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे आंतरराष्‍ट्रीय क्रिकेट मॅचदरम्‍यान घडलेले मज्‍जेदार किस्‍से.

बॉल टाकताना बॉलर पळून गेला
> 1989 मध्‍ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता.
> बेंगलुरूच्‍या मैदानावर भारताविरुद्ध कसोटी खेळली जात होती.
> यात न्यूझीलंडचा गोलंदाज चॅटफील्ड हा ओव्‍हर टाकत होता.
> त्‍याने त्‍या ओव्‍हरचा पहिला चेंडू टाकला.
> दुसरा चेंडू टाकण्‍यासाठी त्‍याने रनअप घेतला आणि अम्‍पायर, फलंदाज, विकेट किपर यांना पार करून थेट ड्रेसिंग रुम गाठली.
> सुरुवातीला काय झाले कुणालाच काही कळले नाही.
> हा प्रकार पाहून प्रेक्षही अचंबित झाले होते.
का सोडले होते मैदान ?
> रात्रीच्‍या जेवणामुळे चॅटफील्ड याची पचनक्रिया खराब झाली होती.
> त्‍याचे पोट गडगडाला लागले.
> प्रेशन वाढल्‍याने तो बॉलिंग टाकता टाकता थेट पळत पळत टॉयलेटमध्‍ये गेला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मैदानावर इतर मज्‍जेदार किस्‍से...