आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहवागच्या वाढदिवशी सचिनचे उल्टे ट्वीट तर विरुचे भन्नाट उत्तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सहवागला वाढदिवसानिमित्त सहकाऱ्यांसह अनेकांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यात सर्वात खास होते, ते सचिन तेंडुलकरचे ट्वीट... क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लोकप्रीय जोडी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या सचिन आणि सहवागने आपल्या ट्वीट्सने सोशल मीडियावर धम्माल केली. नेहमीच आपल्या सहकाऱ्यांची फिरकी घेणाऱ्या सहवागची फिरकी आज सचिनने घेत त्याला उल्टे ट्वीट केले.
 
>> सहवागला शुभेच्छा देण्यासाठी सचिनने केलेले ट्वीट उल्टे लिहिले होते. फोन 180 अंश फिरवल्यानंतरच ते वाचणे शक्य होते. 
>> सचिनने सहवागला मुद्दा असे उल्टे ट्वीट केले. खरं तर त्याने सहवागचा बदला घेतला. 
>> सचिनने मेसेजमध्ये लिहिले, 'हॅपी बर्थडे वीरू! नवीन वर्षाची सुरुवात जबरदस्त होवो. मी तुला मैदानावर जे काही सांगितले होते, तू त्याचे उलट केलास... त्यामुळे, हे (ट्वीट) तुला माझे उत्तर आहे.'
>> याचे उत्तर सहवागने तेवढेच गमतीशीर पद्धतीने दिले. सहवागने लिहिले, 'थँक यू गॉड जी, भगवान सर्व काही पाहात आहे हे तर ऐकले होते. मात्र, भगवान जमीनीवरच्या लोकांसाठी काही लिहितो हे आत्ताच कळाले.'
>> तत्पूर्वी सचिनने सहवागला एक लग्जरी कार गिफ्टमध्ये दिली होती. त्यावर सहवागने केलेल्या ट्वीटवरून सुद्धा खूप चर्चा झाली. 
 
सहवागच्या वाढदिवसानिमित्त कुणी कशा शुभेच्छा दिल्या, पुढील स्लाइड्सवर पाहा...
बातम्या आणखी आहेत...