आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकविरुद्ध मालिका बाेलणी लवकरच; थेट प्रक्षेपण हक्काचा अडथळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- भारत- पाकिस्तान मालिकेबाबत विविध प्रकारच्या चर्चा अाणि अटकळी कायमच सुरू असतात. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीअायने नजीकच्या काळात भारत-पाक मालिकेबाबत दुसऱ्या फेरीची बाेलणी केली जाणार असून त्यात दाेन्ही देशांचे क्रिकेट संबंध पुन्हा सुरळीत करण्याच्या शक्यतांबाबत विचार केला जाणार अाहे.

पाकिस्तान क्रिकेट बाेर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी भारताला भेट देऊन दाेन्ही देशांमध्ये पुन्हा क्रिकेट मालिका खेळल्या जाव्यात यासाठी प्रयत्न केले. बीसीसीअायचे अध्यक्ष जगमाेहन दालमिया यांच्यासमवेत शहरयार खान यांनी एका पत्रकार परिषदेत पाच एकदिवसीय, तीन कसाेटी अाणि दाेन टी - २० सामन्यांची मालिका अागामी डिसेंबरमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला हाेता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप त्याबाबत काहीच संकेत दिले नव्हते.
अन्यकाही सांगणे घाईचे : ठाकूर
येत्याअाठवड्यांत भारत-पाक क्रिकेट खेळण्याबाबतच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रारंभ केला जाऊ शकताे. मात्र, याबाबत अन्य काही सांगणे हे अत्यंत घाईचे ठरेल, असे मत बीसीसीअायचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केले आहे.

बीसीसीआयला पीसीबीचे निमंत्रण
पाकिस्तानक्रिकेट मंडळाच्या वतीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले अाहे, अशी माहिती पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी दिली. झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेतील एक सामना पाहण्यासाठी हे निमंत्रण देण्यात अाले अाहे. लाहाेरमध्ये हा सामना हाेणार अाहे, अशी माहिती पीसीबीच्या वतीने देण्यात अाली.

भारत-पाक मालिकेत थेट प्रक्षेपण हक्काचा अडथळा
यंदा वर्ष अखेर भारत पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरू होण्याचे सूतोवाच बीसीसीआयने केले असले तरीही त्या प्रयत्नात थेट प्रक्षेपण हक्काचा मुद्दा कळीचा ठरू शकेल, अशी सद्य:स्थिती आहे. पाकिस्तानच्या स्वगृही होणाऱ्या मालिकांचे किंवा तटस्थ केंद्रावरच्या मालिकांच्या थेट प्रक्षेपणाचे हक्क ‘टेन स्पोर्ट््स’कडे आहेत. टेन स्पोर्ट््सचे मालक, एस्सेल ग्रुप बीसीसीआयमध्ये गेल्या दशकापासूनची तेढ आहे. पीसीबीने थेट प्रक्षेपण हक्काबाबत बीसीसीआयला शंका असल्यास त्या लेखी स्वरूपात द्याव्यात, असे बीसीसीआय अध्यक्ष दालमिया यांना कळवले आहे. मात्र, बीसीसीआयचे एेकून टेन स्पोर्ट्सला पीसीबीने धोका देण्याचा प्रयत्न केल्यास टेन स्पोर्ट््सही कायदेशीर लढाईस सज्ज आहे.
बातम्या आणखी आहेत...