आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन अाेपन टेनिस: चार वर्षांनंतर राफेल नदाल सत्रात ठरला दाेन वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- नंबर वन राफेल नदाल सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन अाेपन टेनिस स्पर्धेत चॅम्पियन ठरला. त्याने पुरुष एकेरीचा किताब पटकावला. त्याने अापल्या करिअरमध्ये १६ व्या ग्रँडस्लॅम किताबाचा बहुमान पटकावला. तसेच  त्याचा करिअरमधील हा तिसरा अमेरिकन अाेपनचा किताब ठरला.  त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये दक्षिण अाफ्रिकेच्या केविन अँडरसनचा पराभव केला. त्याने ६-३, ६-३, ६-४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. पराभवामुळे अंॅडरसनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने विजयासाठी दिलेली झंुज अपयशी ठरली. 
  
याशिवाय अव्वल मानांकित नदालने चार वर्षांनंतर सत्रामध्ये दाेन वेळा ग्रँडस्लॅम  किताब जिंकले अाहेत. त्याने यापूर्वी २०१० अाणि २०१३ मध्ये अशा साेनेरी यशाला गवसणी घातली हाेती. हार्डकाेर्टवर राफेल नदालने जानेवारी २०१४ नंतर प्रथमच काेणता ग्रँडस्लॅम किताब पटकावला अाहे.   
 
नदाल १४७ मिनिटे लढला. 
स्पेनच्या राफेल नदालने सत्रातील दुसरा अाणि करिअरमधील १६ व्या ग्रँडस्लॅम किताबासाठी तब्बल १४७ मिनिटे म्हणजेच दाेन तास २७ मिनिटे शर्थीची झंुज दिली. यामधील अाक्रमक सर्व्हिसच्या बळावर त्याने सामन्यात अापले वर्चस्व अबाधित ठेवले अाणि विजयश्री खेचून अाली. यादरम्यान त्याने चार वेळा अँडरसनची सर्व्हिस ब्रेक केली. याशिवाय ३० विनर्सही मारले. यामुळे त्याला शेवटपर्यंत अापला दबदबा कायम ठेवता अाला. दरम्यान अँडरसनने केवळ एकाच वेळी नदालची सर्व्हिस ब्रेक केली. मात्र, त्याला लढतीमध्ये एकही सेट जिंकता अाला नाही. यातून त्याला पराभवाचा सामना करावा लागला. तशी संधीच त्याला मिळाली नाही. त्याने ३४ प्रयत्नानंतर अमेरिकन अाेपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला हाेता, मात्र त्याला अपयशाला सामोरे जावे लागले.

नदाल, फेडररचे यंदा शानदार कमबॅक
यंदा २०१७ च्या टेनिस सत्रामध्ये राफेल नदाल राॅजर फेडररने शानदार कमबॅक केले अाणि सत्रात ग्रँडस्लॅम चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. नदालने सरस कामगिरीच्या बळावर यंदा अमेरिकन अाेपन अाणि फ्रेंच अाेपनचा किताब पटकावला. दुसरीकडे स्विसकिंग राॅजर फेडररने सत्रात अाॅस्ट्रेलियन अाेपन अाणि विम्बल्डनचे अजिंक्यपद अापल्या नावे केले.

३७ लाख डाॅलरचे बक्षीस 
किताब विजेत्या राफेल नदालला ट्राॅफीसह ३७ लाख डाॅलरचे बक्षीस देऊन गाैरवण्यात अाले. तसेच उपविजेत्या अँडरसनचाही गाैरव करण्यात अाला. त्याच्या करिअरमधील हा तिसरा अमेरिकन अाेपन किताब अाहे. यासह त्याला २०१४ नंतर या किताबावर नाव काेरता अाले. 

नदालचे ग्रँड यश  
१० : फ्रेंच अाेपन   
०३ : अमेरिकन अाेपन  
०२ : विम्बल्डन  
०१ : अाॅस्ट्रेलियन अाेपन
बातम्या आणखी आहेत...